मुंबई- दोन वर्षांपूर्वी सुशांतसिंह राजपूत च्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने बॉलीवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत, ती थक्क करणारी होती. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणपासून सारा अली खानपर्यंत आणि रिया चक्रवर्तीपासून शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर यांची चौकशी करण्यात आली होती. आता शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर याचेही नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले आहे. बंगळुरू पोलिसांनी ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी सिद्धांतला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या ताब्यात सिद्धांत कपूर, ड्रग्ज घेतल्याचा आरोप

सिद्धांत कपूरला कधी आणि का ताब्यात घेण्यात आले? (Why Siddhanth Kapoor detained)

सिद्धांत कपूरला (Siddhanth Kapoor) रविवारी (१२ जून) रात्री बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले. ते बंगळुरू येथील एमजी हॉटेलमध्ये होते. एएनआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, बंगळुरूमधील एमजी हॉटेलमध्ये एक पार्टी सुरू होती, ज्यामध्ये सिद्धांतदेखील उपस्थित होता. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे पोहोचून छापा टाकला. छाप्यात सिद्धांतसह ६ जणांचे ड्रग्जचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सिद्धांत कपूर

सिद्धांत कपूर बंगळुरुला कधी गेला होता? त्याने पार्टीत खरंच ड्रग्ज घेतली होती का?

१२ जूनच्या रात्री सिद्धांत बंगळुरुला गेला होता आणि रात्री उशिरा हॉटेलमध्ये एक पार्टी होती, ज्यामध्ये सिद्धांत सहभागी झाला होता. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, सिद्धांतज्या हॉटेलमध्ये राहत होता त्याबद्दल कपूर कुटुंबाला काहीच माहिती नव्हती. सिद्धांतचा ड्रग्जचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाहीजणांनी हॉटेलच्या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन केले होते की ड्रग्ज घेऊन ते पार्टीत गेले होते की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

सईची खवय्येगिरी! भात आणि मँगो आइस्क्रीम खाते एकत्र

सिद्धांत कपूरचे कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य

सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरता मुलगा आहे, त्याच्या आईचे नाव शिवांगी कोल्हापुरे आहे, तर मावशीचे नाव पद्मिनी कोल्हापुरे आहे. सिद्धांत कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. तो सध्या सिंगल आहे, पण काही वर्षांपूर्वी तो एरिका पॅकार्डला डेट करत होता. एरिका ही ९०0 च्या दशकातील बॉलिवूड सिनेमांत काम करणाऱ्या प्रसिद्ध खलनायिका गेविन पॅकार्ड यांची मुलगी आहे.

सिद्धांत कपूर

सिद्धांत कपूरचे चित्रपट

सिद्धांतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून सिनेनिर्मिती आणि अभिनयाचा कोर्स केला. त्यानंतर त्याने डिस्क जॉकी म्हणून सुरुवात केली. त्यानंतर सिद्धांतने प्रियदर्शनसोबत ‘चुप चुपके’, ‘भूल भुलैया’, ‘भागम भाग’ आणि ‘ढोल’ यासह अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

सिद्धांत कपूर

या सिनेमांमध्ये सिद्धांत कपूरने केलं होतं काम

सिद्धांतने अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्याने २०१३ मध्ये ‘शूटआउट अॅट वडाळा’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सिद्धांतने ‘अग्ली’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. याशिवाय सिनेमात त्याने छोटेखानी भूमिका केली होती. सिद्धांतच्या ‘जज्बा’, ‘हसीना पारकर’, ‘पलटन’, ‘हॅलो चार्ली’, ‘भूत-भाग १’ आणि ‘चेहरे’ यांचा समावेश आहे. १९९७ मध्ये सलमान खान स्टारर ‘जुडवा’ या सिनेमात सिद्धांतने काम केले होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. या सिनेमात तो रंगीलाच्या भूमिकेत दिसला होता.

सिद्धांत कपूरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.