कोलेस्टेरॉल (Bad cholesterol) वाढणे हा एक गंभीर आणि वेगाने वाढणारा आजार आहे. खराब आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेकांना या जीवघेण्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शरीराला त्याच्या कार्यासाठी थोड्या प्रमाणात कोलेस्टेरॉलची आवश्यकता असली तरी ते जास्त प्रमाणात वाढल्याने हृदयविकार, हार्ट स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चिकट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांना (blood vessels) चिकटू शकतो.

यामुळे रक्ताच्या नसा अर्थात रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात आणि ब्लड सर्क्युलेशन मंद होरू शकते. रक्तप्रवाह (blood flow) कमी झाल्यामुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे वेदनांसोबत गुंतागुंत वाढू शकते. हा घाणेरडा पदार्थ नसांमध्ये जमा झाल्यामुळे शरीराच्या कोणत्या भागात आणि कोणत्या प्रकारची लक्षणे तुम्हाला जाणवू शकतात आणि तुम्ही ही समस्या कशी टाळू शकता ते जाणून घेऊया.

या भागांत होऊ शकतात प्रचंड वेदना

वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे पेरिधीय धमनी रोग (PAD) होण्याचा धोका वाढतो. म्हणजेच तुमच्या खांद्यावर आणि पायांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. यामुळे तुम्हाला तीव्र वेदना होऊ शकतात. हे दुखणे इतके तीव्र असते की झोपेत असतानाही त्रास होऊ शकतो. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या त्वचेच्या रंगात बदल दिसत असेल जो निळा किंवा पिवळा होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(वाचा :- या गंभीर चुका करणा-या लोकांना होतो फुफ्फुसांचा कॅन्सर, या 5 पद्धतींनी करा फुफ्फुसांतील घाण व विषारी घटक साफ)

हेल्दी डाएट घ्यावे

हॉपकिन मेडिसिनच्या तज्ज्ञांचे मत आहे की, तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा, ज्या धमन्या किंवा रक्ताच्या नसा स्वच्छ करण्याचे काम करतात. अभ्यासानुसार, प्लांट बेस्ड डाएट घेतल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

(वाचा :- या मराठमोळ्या तरूणाने ही 1 ट्रिक वापरून फक्त 5 महिन्यात घटवलं तब्बल 20 किलो वजन, फोटो बघून व्हाल हैराण..!)

एक्सरसाइज करा

नियमित व्यायाम हा केवळ तुमच्या आरोग्यासाठी, एनर्जीसाठी आणि आनंदासाठीच चांगला नाही तर ते तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सुुद्धा मदत करू शकतो. जर तुम्ही बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे व्यायाम सुरू करणे.

(वाचा :- पोट, कंबर, मांड्यावरील चरबी झपाट्याने जाईल साखरेसारखी विरघळून, हा 1 पदार्थ या 5 पद्धतींनी खा, लगेच मिळेल रिझल्ट)

वजन कमी करा

तुमचे वजन जास्त असल्यास किंवा तुम्ही लठ्ठ असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. क्लीव्हलँड क्लिनिकच्या एका रिपोर्टनुसार, वजन कमी केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल (LDL cholesterol) कमी होण्यास मदत होते.

(वाचा :- पालकहो मुलांवर संकटाचा डोंगर, टोमॅटो फिवरनंतर मुलांसाठी धोक्याची घंटा बनला HFMD रोग, ही 3 लक्षणं दिसताच डॉक्टरकडे जा)

धुम्रपान करू नका

आपण कोलेस्ट्रॉल कमी करण्याबद्दल गंभीर असल्यास, धूम्रपान करू नका. हे हाय म्हणजे एलडीएल कोलेस्ट्रॉलशी जोडलेले आहे. धूम्रपान तुमच्या हृदयासाठी खूप वाईट आहे. हे केवळ तुमच्या हृदयासाठीच नाही तर तुमच्या मेंदू आणि फुफ्फुसांसाठीही अत्यंत धोकादायक आहे.

(वाचा :- Kidney Health : रोजच्या ‘या’ 5 गोष्टींमुळे किडनी सडते व बनते कच-याचे घर, किडनीच्या सुरक्षेसाठी 10 हात दूर राहा)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.