अहमदनगर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्त्यावरून सध्या वादंग उठलेले असताना लडाखमधील सोनम वांगचुक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नगरमध्ये ज्ञानेश चव्हाण यांनी अलीकडेच लडाखला भेट दिली होती. त्यावेळी गप्पा मारताना त्यांनी वांगचुक यांचा हा व्हिडिओ केला होता.

यावेळी चव्हाण यांच्याशी बोलताना सोनम वांगचुक यांनी महाराष्ट्राचे तोंडभरून कौतूक केले आहे. अनेक उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. विशेष म्हणजे इतर प्रांतातील लोकांना सामावून घेणे आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन या गोष्टी आवडत असल्याचे वांगचुक सांगत आहेत. आपण संपूर्ण देशात फिरतो, मात्र महाराष्ट्रासारखे वातावरण पाहिले नाही. तेथे इतर प्रांतातील लोकांना येऊ दिले आणि मोठे होऊ दिले जाते. म्हणूनच अनेक उद्योजक आणि अभिनेते येथे तयार झाले आहेत, असेही वांगचुक म्हणत आहेत.

वाचा- रोहित शर्मा आज ठरवूनच मैदानात उतरणार; पाकिस्तानचा महा’रेकॉर्ड’ धोक्यात

वाचा- रोहित पवारांच्या मनात राजकारण सोडण्याचा विचार

गेल्या आठवड्यात नगरचे चहा व हॉटेल व्यावायिक असलेले ज्ञानेश चव्हाण लडाखला गेले होते. त्यावेळी त्यांचा वांगचुक यांच्याशी हा संवाद झाला आहे. त्यानंतर राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य आल्यानंतर हा महाराष्ट्राचे कौतूक करणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.