विधाते बनकर वस्तीवर मुक्त विहार करून अनेकांना या ‘कृष्णा’ आणि ‘राधा’चा लळा लागला होता. आपल्याला माणसांपासून काही धोका नाही, असा विश्वास वाटत असल्याने मोर आणि लांडोरची ही जोड या परिसरात सहज वावरत होती. मात्र या मुक्या प्राण्यांना माणसानेच दगा दिला. एक ऑगस्ट रोजी काही विकृतांनी कृष्णाला पकडून नेत त्याची पंख उपटली. यामुळे कृष्णाच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. प्राणीमित्र पिंटू पवार व डॉ. पानसरे यांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु जखमा खोलवर असल्याने गुरुवारी सकाळी कृष्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडनेर भैरव वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिरवाडे वणी येथे कृष्णावर अंत्यसंस्कार केले. यावेळी त्याला सलामी देण्यात आली.
वस्तीला अश्रू अनावर
गेली साडे तीन वर्ष ‘कृष्णा-राधा’ची ही जोडी जोपूळ रोडवर अगदी सहज नजरेस पडत होती. जवळच्याच मंदिरातील घंटा ऐकू आली की कृष्णा तर नित्यनेमाने आरतीला जाऊन थांबायचा. मात्र आता त्याच्या मृत्यूने वस्तीवर शोककळा पसरली आहे. कृष्णाला जीव लावणारे काशीनाथ विधाते, केशव बनकर, ताराबाई धुळे यांच्यासह कुटुंबियांना त्याच्या जाण्याने अश्रू अनावर झाले.
संशयित सापडला, सूत्रधाराचा शोध
परिसरातील एक सीसीटीव्ही फुटेजवरून कृष्णाला जखमी करणाऱ्या संशयित तरुणाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधले आहे. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. आम्ही मुख्य सुत्रधाराचा शोधात असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वडनेर भैरव वन परिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी यांनी दिली.