वर्धा: श्वानाने कोंबडी खाल्ली या कारणातून तिघांनी मुक्या श्वानाला ठार मारुन त्याची परिसरातून धिंड काढून क्रूरतेचा कळस गाठला. ही घटना तेलीपुरा चौक टिळक वॉर्ड परिसरात घडली. याबाबतची तक्रार निसर्गसाथी फाउंडेशनने पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दीपक हेडाऊ, गोलू हेडाऊ, आशिष हेडाऊ यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायदा १९६० अंतर्गत कलम ११(१)(ड) कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

शहरात कुत्र्याला अमानुष पणे ठार मारून त्याची धिंढ काढल्याची माहिती निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू यांच्या निर्दशनास आली. घटनेची दखल घेऊन थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाचा- प्रवासी विमानात बसले होते आणि अचानक…; दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात टळला

शहरातील तेलीपुरा चौकात तिघांनी श्वानाने कोंबडी खाली म्हणून मारहाण केली आणि त्याला ठार मारले. इतकेच नव्हे तर त्याची परिसरातून धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ पाहून निसर्गसाथी फाउंडेशनने दखल घेत पोलिसात तक्रार दाखल केली.

वाचा- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२- पाचव्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

नगरपालिकेने शहरातील चार हजार श्वानांची नसबंदी करुन मोकाट फिरणाऱ्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवून शहराचे पर्यावरण स्वच्छ ठेवावे तसेच शहरात बाहेरून होणारी श्वानांची आयात थांबवावी, अशी मागणी निसर्गसाथी फाऊंडेशनने केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.