नवी दिल्लीः गेल्या काही आठवड्यांपासून श्रीलंकेतील आर्थिक दिवाळखोरी आणि राजकीय अस्थिरता हा चर्चेचा विषय आहे. देशात नवीन सरकार आलं आहे. मात्र, तरीही श्रीलंकेतील आर्थिक संकट जैसे थे आहे. श्रीलंका अद्यापही देशावरील कर्ज फेडण्यासाठी सक्षम नसल्यानं इतिहासात पहिल्यांदाच देशाचा कर्जबुडव्यांच्या यादीत (defaulter list) यादीत समावेश झाला आहे. (Sri Lanka warns of food shortage)

काही महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे. आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेच्या या कठिण काळात भारत संकटमोचन म्हणून धावला आहे. भारताकडून श्रीलंकेला सर्वतोपरी मदत केली जात आहे. लंकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी भारतदेखील मदत करत आहे. रविवारपर्यंत भारताने श्रीलंकेत औषधांपासून- अन्नधान्यांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे सामान पाठवण्याची तजवीज केली आहे. भारताकडून श्रीलंकेला ९००० मेट्रिक टन तांदूळ, २०० मेट्रिक टन दूध पावडर, २४ मे.ट औषध देण्यात येत आहे. हे सर्व सामान रविवारपर्यंत श्रीलंकेत पोहोचणार आहे.

वाचाः मंकीपॉक्सचे थैमान: भारतातही सरकार ‘अलर्ट मोड’वर; NIV आणि ICMRला दिल्या सूचना

भारत सरकार श्रीलंकेत जवळपास ४५ कोटींचे सामान पाठवत आहे. याआधीही भारताने श्रीलंकेला मदत केली होती. तर, भारताने केलेल्या मदतीसाठी श्रीलंकेने देखील आभार मानले होते. दरम्यान, चीनचे श्रीलंकेवर वाढते वर्चस्व पाहता भारताने ही रणनिती अवलंबली आहे, असंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

वाचाः मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

चीनमुळं श्रीलंकेवर कर्जाचा डोंगर

श्रीलंकेतील राजकीय अस्थिरतेमागे चीनच्या कर्जाचा सापळा हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. चुकलेली शेतीची धोरणे, करोनाचा प्रादुर्भाव व पर्यटनाला बसलेला फटक्यापासून हंबनटोटासारख्या फसलेल्या प्रकल्पांपर्यंत सर्वांचे विश्लेषण होत आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक आणि राजकीय आघाड्यांवर उलथापालथ होण्याला चीनच्या कर्जाच्या डोंगराचे मुख्य कारण असल्याचेही दिसून येत आहे.

वाचाः हैदराबादः संशयिताना ठार करण्याच्या हेतूने पोलिसांचा गोळीबार; सर्वोच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेशSource link

Leave a Reply

Your email address will not be published.