बर्मिंगहम : हाताला झालेली दुखापत. त्यामुळे हाताला बऱ्याच पट्ट्या बांधलेल्या होत्या. दुसरी कोणी खेळाडू असली असती तर ती मैदानातच उतरली नसती. पण भारताच्या पूर्णिमा पांडेने हार मानली नाही. पूर्णिमाने वेटलिफ्टिंगच्या ८७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये उतरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाला पदक मिळवता आले नाही, पण तिने भारताचे नाव मात्र राखले.

वाचा-Live सामना अर्धवट सोडून गेल्यानंतर रोहित शर्माने दिली पहिली प्रतिक्रीया, म्हणाला…

वेट लिफ्टिंगच्या स्नॅच प्रकारात पूर्णिमाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्याच प्रयत्नात तिने १०३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये ती अपयशी ठरली. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये पूर्णिमाने हेच १०३ किलो वजन यशस्वीरीत्या पेलवले आणि पदकाच्या आशा कायम ठेवल्या. पण त्यानंतर पूर्णिमा पांडेला क्लीन अँड जर्क फेरीत दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात १३३ किलो वजन उचलण्यात अपयश आले. त्यामुळे ती पदकाच्या स्पर्धेतून बाहेर पडली.

वाचा-भारत-वेस्ट इंडिजमधील अमेरिकेतील सामने रद्द झाले तर कुठे होणार, जाणून घ्या मास्टर प्लॅन

भारताचा पूर्णिमा पांडेने आज झालेल्या वेटलिफ्टिंगच्या ८७ किलो गटाच्या महिला विभागात दमदार सुरुवात केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पूर्णिमा पांडेने अपेक्षापूर्ती करत भारताचे नाव राखले. पहिल्या फेरीत पूर्णिमा पांडेने अपेक्षेपेक्षा जास्त वजन उचलले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

वाचा-भारताला एकहाती विजय मिळवून दिल्यावर सूर्यकुमार यादवसाठी आली गूड न्यूज

पूर्णिमाने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरेख कामगिरी केली आहे. पूर्णिमाने २०२१ साली कॉमनवेल्थ सीनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यापूर्वी २०१७ साली झालेल्या कॉमनवेल्थ ज्युनियर चॅम्पियनशिप रौप्यपदकाची कमाई केली होती. पूर्णिमाने २०१६ साली दोन आंतरराष्ट्रीय पदके पटकावली होती. तिने यावर्षी आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर ज्युनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

पूर्णिमा पांडे ही मूळची उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या गया घाटाची आहे. तिने २०१४ मध्ये वेटलिफ्टिंगला सुरुवात केली. जरी तिला या खेळाला सुरुवात करण्यास उशीर झाला असला तरी, तिला या खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यास जास्त वेळ लागला नाही. तिने २०१६ मध्ये तिची पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली आणि त्याच वर्षी २०१६ मध्ये ती भारतीय राष्ट्रीय शिबिरात सामील झाली.

यापूर्वीची पूर्णिमाची कामगिरी पाहा…
२०२१ कॉमनवेल्थ सीनियर चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती
२०१७ कॉमनवेल्थ ज्युनियर चॅम्पियनशिप रौप्य पदक विजेती
२०१६ आशियाई युवा चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती
२०१६ ज्युनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेतीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.