मुंबई– सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हे शाखेने पत्र पाठवणाऱ्या आरोपीची ओळख पटवली असून ती लॉरेन्स बिश्नोईचीच टोळी आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेला या लोकांशी संबंधित सुगावा लागला असून, पोलीस त्यांना लवकरच अटक करतील. त्यांची ओळख उघड झाल्यानंतर लगेचच पोलिसांच्या सहा टीम देशाच्या विविध भागात रवाना झाल्या आहेत.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या तीन सदस्यांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवले होते. या टोळीतील कथित सदस्य महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली असून त्याच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.