मुंबई : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईत बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा सुरू केली आहे. गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर खासदार राहुल शेवाळे आणि आमदार दिलीपमामा लांडे यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढत निवडणुकीला सामोरे जाण्याचं आव्हान दिलं. तसंच, तुम्ही कितीही नाव बदललात तरी गद्दारला गद्दारच म्हणणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी मानखुर्द-अणुशक्तीनगर येथील शाखा क्रमांक १३९ आणि चांदीवली येथी शाखा क्रमांक १६२ ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. एक वेळ होती मी आमदारांना निवडून आणण्यासाठी जात होतो. मात्र त्यांनी पक्ष प्रमुखांसोबत गद्दारी केली. त्यांना जायचा होता तर गेले असते. जिथे आहात सुखी राहा, नगरसेवक पासून स्टेंडिंग कमिटी; नंतर दोन वेळा खासदार केलं असं म्हणत जायचं होतं गेलात पण थोडी लाज बाळगा, राजीनामा द्या आणि जनतेसमोर जाऊन निवडून या, असं खुलं आव्हान पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार-खासदार यांना दिलं.

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंना धक्का, ३० वर्षांपासूनच्या अभेद्य बालेकिल्ल्याला खिंडार

आदित्य ठाकरे यांनी चांदीवली येथे दिलीपमामा लांडे यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांशी बोलताना दिलीप लांडे यांच्या केलेल्या कामांची यादीच वाचली. कामं करून देखील गद्दारी केल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. पूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा करत आहे. ज्या माणसाला मी आपल्या जवळच्या समजत होतो. दिलीप मामा यांनी जेवढं वेळ बोलावलं मी आलो. त्यांच्या साठी काय कमी केला आम्ही की ते निघून गेले? दिलीप मामाला आम्ही काहीच कमी केलं नाही. चांदीवली हा भाग दिलीप मामा लांडे यांचा आहे. आम्ही या मतदार संघात अनेक वेळा फिरलो. त्यांचे अनेक प्रश्न सोडविले, काय चूक केली? 100 लोकांना चावी वाटप केलं, अनेक कामे आम्ही चांदीवलीत केली, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
भारताचे दोन क्रिकेट संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार, पाहा शुक्रवारी नेमकं घडणार तरी काय…

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी अजाण सुरू होताच भाषण थांबवलं.

दिल्लीत हालचालींना वेग; मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीत बोलावलं?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.