गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO sundar pichai) यांना 10 जून रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण झाली. सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात झाला. सुंदर यांनी आयआयटी खड्गपूर येथून बीटेक आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमएसचे शिक्षण घेतले. सुंदर हे आजही आई वडिलांनी दिलेल्या शिकवणीवर चालतात. त्यांच्याकडे पाहून वाटते प्रत्येक मुलाने जर आपल्या आई वडिलांचे चांगले संस्कार फॉलो केले तर प्रत्येक जण सुंदर यांच्यासारखा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही विदेशात राहायला असाल किंवा भारतात, प्रत्येक घरातील पालकांचा एक नियम असतो जो ते लहानपणापासून आपल्या मुलांना शिकवतात. तो नियम म्हणजे सकाळी लवकर उठणे होय. याशिवाय सुद्धा अनेक सवयी ते आपल्या मुलांना लावतात जसे की सकाळी चालायला जाणे, व्यायाम करणे, फोनचा वापर कमी करणे. पण भारतीय घरांमध्ये दिवसाची सुरूवात कोणत्या नियमापासून होते? आपल्या मुलांना यशस्वी झालेलं पाहायचं असेल तर काय करावं लागतं? घ्या जाणून सर्व प्रश्नांची उत्तरे.

सुंदर पिचाई यांचे मॉर्निंग रूटीन

ज्या प्रकारचे रूटीन आपले आई-वडिल आपल्याला शिकवू इच्छितात अगदी तसंच रूटीन सुंदर पिचाई विदेशात सुद्धा फॉलो करत आहेत. त्यांचे मॉर्निंग रुटीन समजून घेऊन एक पालक म्हणून तुम्हाला देखील आनंद होईल. कारण आपल्या मुलाने सुद्धा हे रूटीन फॉलो करावे असे तुम्हाला देखील वाटेल. हे रूटीन केवळ आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भागच नाही तर एका हेल्दी आणि आनंददायी जीवनाचा पाया आहे. गावाकडच्या ठिकाणी आजही असे रूटीन फॉलो केले जाते आणि म्हणूनच ते एक उत्तम आयुष्य जगतात.

(वाचा :- When baby recognize fathers : कितव्या आठवड्यात तुमचं बाळ तुम्हाला ओळखायला लागतं, एक्सपर्टकडून जाणून घ्या प्रोसेस)

काय आहे हे रूटीन?

2016 मध्ये ‘Recode’ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पिचाई यांना त्यांच्या मॉर्निंग रूटीन बाबत विचारले गेले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की मला लहानपणापासूनच आई वडिलांनी लवकर उठण्याची सवय लावली होती. आम्ही कधीच अंथरुणात जास्त वेळ लोळत पडलेले नसायचो. लवकर उठण्याचे फायदे आमच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवले गेले आणि मग ती सवयच मला लागली आणि आजही ती सवय तशीच आहे. मला सकळी लवकर जाग यते आणि माझा दिवस लवकर सुरु होतो.” सुंदर पिचाई रोज 6:30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान उठतात.

(वाचा :- Nipple Discharge Without Pregnant : गर्भवती नसतानाही निप्पलमध्ये स्त्राव येतोय? हे वंधत्वाचं तर लक्षण नाही ना, जाणून घ्या)

वर्तमानपत्र वाचतात

उठल्यानंतर त्यांना वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. हातात सकाळी पेपर हा हवाच. प्रय्त्येक भारतीय घरात आपल्याला हेच चित्र दिसतं. घरातील वडीलधारी मंडळी सकाळी उठल्यावर स्नान वगैरे करून मग पहिला पेपर हातात घेतात आणि सोबतीला चहा व नाश्ता असतोच. सुंदर पिचाई यांच्या घरी सुद्धा त्यांचे वडील हेच रूटीन फॉलो करायचे. घरी रोज वर्तमानपत्र येत असल्याने वाचनाची आवड लागते. अनेक नवनवीन गोष्टी कळतात. पण जगाशी कनेक्टेड राहतो. त्यामुळे रोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे ही एक चांगली सवय आहे.

(वाचा :- स्तनपान थांबवल्यानंतर वजन वाढले? मग या ५ गोष्टी कराच)

चहा पिणे

कोणत्याही भारतीय व्यक्तीला सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन पहिला चहा हवाच, अनेकजण बेड टी देखील घेतात. एकंदर चहा हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे पेय आहे. सुंदर पिचाई यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की चहा प्यायल्या शिवाय त्यांचा दिवसच सुरु होत नाही. चहा प्यायल्यावरच फ्रेश वाटते आणि मगच कामाला सुरुवात होते. शिवाय चहासोबत भारतीय पद्धतीचा नाश्ता देखील करतात. सकाळचा नाश्ता हा हेवी आणि भरपेट करावा असे त्यांना लहानपणापासून शिकवले गेले आहे आणि त्यामुळे त्याची सवय आजही कायम आहे.

(वाचा :- लग्न झालेल्या प्रत्येक पुरूषाने खावी लवंग, शुक्राणूंच्या संख्येपासून ते टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढेपर्यंत अशी करेल मदत)

व्यायाम करत नाहीत

आता तुम्हाला वाटत असेल एवढे सगळे रूटीन फॉलो करणारे सुंदर पिचाई सकाळी व्यायाम करत नाहीत का? तर मंडळी, त्यांचे उत्तर आहे नाही. सुंदर पिचाई हे सकाळी व्यायाम वा कोणताही वर्कआउट करत नाहीत. उलट ते संध्याकाळच्या वेळेस वर्कआउट करण्यास पसंती देतात. अर्थात ते बॉडी वगैरे बनवण्यासाठी व्यायाम करत नाही. त्यामुळे हलका फुलका पण शरीर फिट राहील एवढा व्यायाम करतात. त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी मॉर्निंग पर्सन नाही आहे. त्यामुळे माझी प्रत्येक सकाळ केवळ चहा आणि वर्तमानपत्र यांच्या सोबतच होते.”

(वाचा :- प्रियंका चोप्राच्या मुलीला द्यावी लागली १०० दिवसांची ‘अग्निपरीक्षा’, काही मुलांसोबत का होतं असं?)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.