पुणे: एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राजपाल भगत सिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना बोचणारं वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले, तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असं व्यक्तव्य कोश्यारी यांनी केलं. या व्यक्तव्यानंतर महाराष्ट्रातून राज्यपालांवर टीकेची झोड उठू लागली आहे. राज्यपालांच्या या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांचं मत व्यक्त केलं.

गुजराती निघून गेला तरी मुंबईवर अजिबात परिणाम होणार नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबई मधला जो गुजराती आहे, तो इलेक्ट्रॉनिक बाजारांमधला गुजराती नसून दाणा आणि दवा बाजारात गुंतलेला गुजराती आहे आणि अधिक प्रमाणात दलाली करतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई मधून गुजराती जरी निघून गेला तरी त्याचा मुंबईवर अजिबात परिणाम होणार नाही. म्हणून जी परिस्थिती राजस्थानी मील मालकांची झाली तशी परिस्थिती या गुजराती व्यापाऱ्यांची सुद्धा होईल. याची जाणीव राज्यपालांना नसावी, म्हणून त्यांनी अस विधान केले असावे. असा सूचक टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

हेही वाचा –कोश्यारींचं वक्तव्य वैयक्तिक, आम्ही सहमत नाही, भाजपपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही हात झटकले

येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी सक्रिय होताना दिसत आहे. आज पुण्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येत आहे. यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असताना ते म्हणाले, मुंबईची आताची परिस्तिथी काय आहे, मागच्या काळातली परिस्तिथी काय होती हे समजून घेण्याची गरज आहे.

हेही वाचा – शिंदेशाहीला महिना पूर्ण; शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, राज्य सरकारचे १० मोठे निर्णय

१९८० नंतर राजस्थानी निघून गेल्यावरही मुंबई आर्थिक राजधानी राहिली – प्रकाश आंबेडकर

मुंबईमध्ये ज्या मिल होत्या त्या राजस्थानी लोकांच्या होत्या. १९८० साली संपानंतर ते निघून गेले तरी सुद्धा मुंबई हे आर्थिक राजधानी राहिली, याचा परिणाम राजस्थानी लोकांवर झाला. राजस्थानी लोकांचं वर्चस्व टेक्स्टाईल इंडस्ट्रियलवर होतं ते संपलं आणि ते दक्षिणातल्या लोकांनी घेतलं, ही आताची वस्तू परिस्थिती आहे.

हेही वाचा – राज्यपालांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांचा सेफ गेम, हात झटकले, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे योगदान, राज्यपालांच्या वक्तव्यानं नवा वादSource link

Leave a Reply

Your email address will not be published.