अकोला : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील (Jayashree Patil) आज चौकशीसाठी अकोट पोलिसांसमोर हजर झाले. अकोट पोलिसांनी ११ एप्रिलला गुणरत्न सदावर्ते, पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडे अशी चौघांवर गुन्हे दाखल केले होते. एसटी कामगारांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसुल केल्याच्या आरोपाप्रकरणी हे गुन्हे दाखल आहेत. २१ एप्रिलला अकोट न्यायालयाने सदावर्तेंना नियमित जामीन मंजूर केला होता. आज अकोट शहर पोलिसांनी तब्बल साडेतीन तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडलंय. यावेळी सदावर्तेंनी अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त केली. (akot police interrogated gunaratna sadavarte and his wife jayashree patil)

आज अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी सदावर्ते अन् त्यांच्या पत्नी जयश्री यांची चौकशी केली आहे. तब्बल साडेतीन तासावर ही चौकशी अहिरे यांच्या कक्षात सुरू होती. या दरम्यान त्यांना फसवणुकीसंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आली. भविष्यात चौकशीसाठी आणखी आवश्यकता असल्यास त्यांना पुन्हा हजर राहायला सांगितले, असे पोलीस निरीक्षक प्रकाश अहीरे यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- पोलीस महानिरीक्षकाच्या नावाने पोलीस अधिकाऱ्यांना लाखो रुपयांनी गंडवले; पत्रकार गोत्यात


असे आहेत या चौघांवर आरोप


वकील सदावर्ते आणि त्याच्या पत्नी जयश्रीसह औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. ७४ हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मालोकार यांनी अकोट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता.

क्लिक करा आणि वाचा- सामाजिक परिवर्तनाची नांदी; परंपरेची चौकट मोडत अकोल्यात विधवांनी साजरी केली वटपौर्णिमा


सदावर्तेंसह पत्नी अ‍ॅड. जयश्रींना मिळाला होता जमीन

दरम्यान, अकोट पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी १९ एप्रिल रोजी अकोट न्यायालयात ‘अटकपूर्व जामीन’ अर्ज दाखल केला असून त्यावरील सुनावणीनंतर अकोट न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. २५ हजार रूपयांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला होता.

क्लिक करा आणि वाचा- आई-वडिलांचं छत्र हरपलं, अनाथ लेकीसाठी बच्चू कडू झाले ‘बाप’, केलं कन्यादान


यासंदर्भात न्यायालयात सरकारी वकील अजित देशमुख यांनी तर सदावर्ते यांच्याकडून वकील मुन्ना खान यांनी बाजू मांडली. तर सदावर्ते यांच्याकडून ७४ हजार ४०० रूपये रक्कमही पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती, तर अकोट पोलिसांत दाखल असलेला गुन्हा हा फसवणुकीचा होवू शकत नाही, कारण एखादा वकील आपली ‘फी’ घेवू शकतो, जर त्यांचा व्यवसाय असेल आणि ते मान्य करीत असणार ‘मी’ पैसे घेतले मान्य करतो, त्यामुळे ही फसवणूक होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेणार असल्याचे सदावर्ते यांचे वकील मुन्ना खान यांनी त्यावेळी म्हटले होते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.