बेंगळुरू : बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारी यांनी शुक्रवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अशी कामगिरी केली, जी गेल्या ८८ वर्षांत कुणालाच जमली नव्हती. क्रीडामंत्री असताना शतक करणारे तिवारी ही पहिलेच क्रिकेटपटू ठरले आहेत. बेंगळुरूत पार पडलेल्या झारखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत बंगालने पहिल्या डावात ७ बाद ७७३ धावांवर डाव सोडला होता. सहाजिकच त्यांना डावाची आघाडी लाभली होती. त्यामुळे शुक्रवारी पाचव्या दिवसाचा खेळ फक्त औपचारिकतेपुरताच उरला होता. या पाचव्या दिवशी बंगालच्या दुसऱ्या डावात मनोज तिवारीने १३६ धावांची खेळी साकारली. आपल्या क्रीडा मंत्रालयात बंगालच्या क्रीडा क्षेत्रासंबंधी निर्णय घेणाऱ्या तिवारी यांनी मैदानात झारखंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत १९ चौकार आणि दोन षटकार तडकावले. शाहबाझ अहमदने ४६, अनुस्तूप मजूमदारने ३८, तर अभिषेक पोरेलने ३४ धावांची खेळी केली.

बंगालचा फलंदाज मनोज तिवारीने झारखंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्याच्या शतकी फटकेबाजीमुळे बंगालला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. मनोजने पहिल्या डावात ७३ धावा केल्या होत्या. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २८ वे शतक आहे. बंगालच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात दमदार खेळ केला आणि त्यांनी आता थेट उपांत्य फेरीत स्थान पटकाले आहे. रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आता चार संघ ठरलेले आहेत. बंगालबरोबरच रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आता मुंबई, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश हे चार संघ असणार आहेत.

स्कोअरबोर्ड : बंगाल ७ बाद ७७३ डाव सोडला (अभिषेक रमण ६१, अभिमन्यू इस्वरन ६५, सुदीप घरामी १८६, अनुस्तूप मजूमदार ११७, मनोज तिवारी ७३, अभिषेक पोरेल ६८, शाहबाझ अहमद ७८, सयान मोंडल नाबाद ५३, आकाशदीप नाबाद ५३) आणि ७ बाद ३१८ डाव सोडला (मनोज तिवारी १३६) वि. झारखंड २९८ (नझिम सिद्दीकी ५३, विराटसिंग नाबाद ११३; सयान मोंडल २१-५-७१-४, शाहबाझ अहमद २१-७-५१-४).Source link

Leave a Reply

Your email address will not be published.