नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केलाय. पण स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर देखील नीरजला सुवर्णपदक जिंकता आले नाही. भारताच्या या स्टार भालाफेकपटूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

फिनलँडमधील पावो नुरमी गेम्समध्ये नीरजने ८९.०३ मीटर लांब थ्रो केला. याआधी त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. गेल्या वर्षी टोकियोतील या कमगिरीने त्याला ऑलिंपिकमधील सुवर्णपदक मिळाले होते.

ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर १० महिन्यांनी नीरज चोप्राची ही पहिलीच स्पर्धा होती. पहिल्या प्रयत्नात नीरजने ८६.९२ मीटर थ्रो केला. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात नीरजने प्रयत्न केला पण ८५.८५ मीटर थ्रो गेला.

वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये पावो नुरमी एक मोठी स्पर्धा मानली जाते. डायमंड लीगनंतरची ही सर्वात मोठी ट्रॅक फील्ड स्पर्धा आहे. या स्पर्धेत फिनलँडच्या ओलिव्हर हेलेंडरला सुवर्णपदक मिळाले. त्याने ८९.९३ मीटर लांब थ्रो केला. या स्पर्धेत भाग घेणारा नीरज हा एकमेव भारतीय खेळाडू होता. या कामगिरीमुळे नीरजची पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्याचा आत्मविश्वास वाढेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.