नवी दिल्लीः recharge plan hike soon : सध्या महागाई खूप वाढली आहे. महागाईपासून दिलासा मिळण्याआधीच टेलिकॉम कंपन्या आपल्या यूजर्संना पुन्हा एकदा जोरदार झटका देण्याची तयारी करीत आहेत. लवकरच टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर कंपन्या Airtel, Reliance Jio आणि VI च्या प्लान्सच्या किंमतीत वाढ करू शकतात. ही माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. जर टेलिकॉम कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम खरेदी करावे लागले तर त्यांना एक लाख कोटी रुपये ते १.१ लाख कोटी रुपये द्यावे लागतील. कंपन्या आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आहेत. त्यामुळे रक्कम चुकवण्यासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. या कर्जाला चुकवण्यासाठी टेलिकॉम कंपन्याला प्लान्सच्या किंमतीत वाढ करावी लागू शकते.

टॅरिफ प्लान्समध्ये होऊ शकते वाढ
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत वाढ होऊ शकते. ही वाढ २० टक्क्यांपर्यंत होऊ शकते. त्यामुळे जून नंतर टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत वाढ केली जावू शकते. कंपन्यांनी याआधी त्यांच्या प्लानमध्ये वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा ग्राहकांना जोरदार झटका बसणार आहे.

वाचा: Recharge Plans: एकाच रिचार्जमध्ये संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग-डेटासह ओटीटी बेनिफिट्स; पाहा डिटेल्स

यूजर्सला जास्त पैसे मोजावे लागणार

टेलिकॉम इंडस्ट्रीसाठी नेटवर्क आणि स्पेक्ट्रम मध्ये गुंतवणूक करणे खूप अवघड काम आहे. कारण, प्रति यूजरची सरासरी रिवेन्यूला वाढवावे लागते. २०२१ – २२ मध्ये प्रति यूजर सरासरी राजस्व (एआरपीयू) मध्ये वाढ कमी होती. तर वर्ष २०२२-२३ मध्ये या दरम्यान टॅरिफ प्लान्स मध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची अपेक्षा आहे. Reliance Jio, Airtel आणि Vi ने ६ महिन्यापूर्वी टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत वाढ केली होती. डिसेंबर २०२१ मध्ये टॅरिफ प्लानच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

वाचाः ग्राहकांनी ठरवून या ३ टेलिकॉम कंपन्यांना अस्मान दाखवलं

वाचाः Jio-Airtel-Vi ला ग्राहकांनी दिला मोठा झटका, लाखो यूजर्सनी सोडली साथ; पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.