नवी दिल्ली: Offer On Vu Smart TV: तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ५० इंच ४के स्मार्ट टीव्ही Amazon India वर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Amazon च्या डील ऑफ द डे अंतर्गत Vu च्या ५० इंच ४के स्मार्ट टीव्हीला VU 50PM) १५,००१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर हा टीव्ही २९,९९९ रुपयात उपलब्ध होईल. या टीव्हीची मूळ किंमत ४५ हजार रुपये आहे. याशिवाय, टीव्हीवर १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. या डिस्काउंटसाठी तुम्हाला ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करावे लागेल. तुमच्याकडे अ‍ॅमेझॉन पे ICICI क्रेडिट कार्ड असल्यास टीव्हीला नो-कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता.

वाचा: तुमच्या आधार कार्डवर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड? असे घ्या जाणून

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Vu च्या या टीव्हीमध्ये ५० इंच ४के डिस्प्ले दिला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन २१६०x३८४० आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. हा डॉल्बी व्हिजन व एचडीआर १० सपोर्ट करतो. या टीव्हीद्वारे तुम्हाला घरीच थिएटरचा आनंद मिळेल. यासाठी कंपनीने ३० वॉटचे स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट दिला आहे. हा टीव्ही चारकोल ग्रे आणि स्लिम बेझल्ससह येतो, जे याच्या लुकला प्रीमियम बनवते.

वाचा: ऑफिसच्या कामापासून ते गेमिंग… प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगी येतील ‘हे’ दमदार लॅपटॉप्स, जाणून घ्या किंमत

टीव्हीमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. हा टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो. यात Mali ४७० MP३ ग्राफिक्स कोप्रोसेसर आणि DVB-T२ ट्यूनर दिले आहे. वीयूचा हा टीव्ही AVI आणि MPEG मीडिया फॉर्मेटसह MP३ आणि WMA ऑडिओ फॉर्मेट्सला सपोर्ट करतो. टीव्हीत बिल्ट-इन क्रोमकास्ट, गुगल असिस्टेंट आणि प्ले स्टोर देखील मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात तीन HDMI पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक इथरनेट पोर्ट आणि एक ३.५mm हेडफोन जॅक दिला आहे. तर वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय आणि ब्लूटूथ ५.० सारखे पर्याय आहेत.

वाचा – ‘या’ दिवशी एंट्री करणार Apple iPhone 14 सीरिज, लाँचआधी जाणून घ्या फीचर्स-किंमतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.