रायपूर: ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच गोमूत्रही खरेदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल गोमूत्राचे पहिले विक्रेते ठरले आहेत. त्यांनी विकून २० रुपये कमावले आहेत. गोमूत्राची खरेदी करणारं छत्तीसगड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी एका स्वयंसेवी गटाला ५ लीटर गोमूत्र २० रुपयांना विकलं. त्यामुळे बघेल राज्यातील पहिले गोमूत्र विक्रेते ठरले. स्वयंसेवी गटानं ही रक्कम बघेल यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली. गोधन न्याय योजना बहुआयामी ठरेल आणि या योजनेचा लाभ पाहून देशातील इतर राज्यंदेखील योजना सुरू करतील, असा विश्वास बघेल यांनी व्यक्त केला.

गेल्या दोन वर्षांत गोधन न्याय योजनेच्या माध्यमातून शेण विक्रेते, गोशाळा समित्या आणि महिला बचत गटांच्या खात्यात ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. छत्तीसगडमधील शेती वाढावी आणि शेतकऱ्यांची भरभराट व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे बघेल म्हणाले. जैविक खतं आणि जैविक किटकनाशकं यांचा वापर केल्यानं शेतीसाठी येणारा खर्च कमी होईल. धान्याचा दर्जा सुधारेल. त्यामुळे लोकांचं आरोग्य चांगलं राहील, असं बघेल यांनी म्हटलं.

पशू पाळणाऱ्या ग्रामस्थांकडून २ रुपये किलो दरानं शेणाची खरेदी करणारं छत्तीसगड हे देशातलं पहिलं राज्य आहे. दोन वर्षांपूर्वी छत्तीसगड सरकारनं याची सुरुवात केली. त्यानंतर आता सरकारनं गोमूत्र खरेदीही सुरू केली आहे. चार रुपये लीटर दरानं सुरू आहे. पशुपालनाला संरक्षण देणं आणि जैविक शैतीला प्रोत्साहन देणं हे राज्य सरकारचे प्रमुख हेतू आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.