मुंबई: बेअर ग्रिल्सच्या लोकप्रिय शोमध्ये आता रणवीर सिंग जाऊन पोहोचला आहे. यावेळी जंगलामध्ये रणवीरसाठी ‘पळता भुई थोडी’ झाली आहे. रणवीरच्या मागे अस्वल लागल्याचा व्हिडिओ अभिनेत्याने पोस्ट केला आहे. बेअर ग्रिल्सच्या या ‘रणवीर Vs वाइल्ड विद बेअर ग्रिल्स’ (Ranveer Vs Wild with Bear Grylls) शोचा टीजर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बेअर ग्रिल्सचा जंगलातील अ‍ॅडव्हेंचर दाखवणारा हा शो नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी बेअर ग्रिल्ससह ‘इनटू द वाइल्ड’मध्ये अक्षय कुमार, विकी कौशल, अजय देवगण, रजनिकांत यांसारख्या कलाकारांनी देखील साहस दाखवलं आहे. आता रणवीर सिंग या कार्यक्रमात दिसणार आहे.

‘जंगल जंगला पता चला है.. की गोष्टी आता वाइल्ड होणार आहे. तर सेफ्टी गिअर शोधा कारण कधीही काहीही होऊ शकतं.’ अशा कॅप्शनसह रणवीर याने या शोचा पहिला टीजर देखील शेअर केला होता. ज्यात एका जंगलात नेटफ्लिक्सचा लोगो पाहायला मिळत होता. मात्र त्यात नेमकं काय असणार याचा उलगडा झाला नव्हता. आता समोर आलेल्या टीजरनुसार रणवीर सिंग आणि बेअर ग्रिल्स यांचे अ‍ॅडव्हेंचर पाहायला मिळणार आहे.

हे वाचा-Britney Spears च्या लग्नात आधीच्या नवऱ्याने केला तमाशा, पोलिसांनी केली अटक

‘रणवीर Vs वाइल्ड विद बेअर ग्रिल्स’ चा एक प्रमोशनल व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका अस्वलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे, तर रणवीर सिंग वाट मिळेल तिथे पळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शेवटी रणबीर म्हणतो की- बटण दाबा आणि माझा जीव वाचवा.


यानंतर बेअर ग्रिल्स आणि रणवीर सिंग यामध्ये साहसाचा आनंद घेताना दिसत आहेत. यामध्ये रणवीर मध्येच घाबरलेला दिसतो आहे तर कधी तो त्याच्या मस्ती करण्याच्या अंदाजात दिसत आहे. या सर्व गोष्टी कशा करायच्या असाही प्रश्न त्याला पडला आहे. रणवीरचा हा जंगल सफारीचा एपिसोड ८ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार आहे.

हे वाचा-ISI ने केली मूसेवालाची हत्या? दहशतवाद्याचा मित्र निघाला बिश्नोई

रणवीरने या शोसाठी शूटिंग गेल्यावर्षी जुलैमध्ये केली होती. त्यासाठी रणवीर सिंग याने सर्बिया देखील गाठले होते. या शोमधून रणवीर पहिल्यांदा एका कार्यक्रमासाठी ओटीटीवर एंट्री करत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.