सेंट किट्स: भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies vs India) यांच्यात आज (१ ऑगस्ट) दुसरी टी-२० लढत होणार आहे. भारताने पहिल्या टी-२० सामन्यात ६८ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला आघाडी घेण्याची संधी आहे.

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma)ला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. यासाठी हिटमॅनला ५७ धावांसोबत चार षटकार मारण्याची गरज आहे.

वाचा- रोहित शर्मा आज ठरवूनच मैदानात उतरणार; पाकिस्तानचा महा’रेकॉर्ड’ धोक्यात

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००७ साली पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत ४०७ सामन्यात ४७३ षटकार मारले आहेत. रोहितच्या पुढे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आहे. त्याने ४७६ षटकार मारले आहेत. तर अव्वल स्थानी क्रिस गेल असून त्याने ४८३ सामन्यात सर्वाधिक ५५३ षटकार मारलेत. आज रोहितने चार षटकार मारल्यास तो आफ्रिदीला मागे टाकू शकतो आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो.

वाचा-CWG 2022 India Day 4 LIVE: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

त्याच बरोबर रोहितने आजच्या लढतीत ५७ धावा केल्यास तो आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार ५०० धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी आजवर कोणी केली नाही. रोहित शर्मानंतर न्यूझींलडच्या मार्टिन गप्टिलने ३ हजार ३९९, भारताच्या विराट कोहलीने ३ हजार ३०८, आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने २ हजार ८९४ तर ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचने २ हजार ८५५ धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहितने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या होत्या. आज देखील रोहितकडून चाहत्यांना अशाच खेळीची अपेक्षा असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.