नवी दिल्ली: Latest Buds: OnePlus Nord Buds CE True Wireless Earbuds आज भारतात लाँच करण्यात आले आहेत. डिव्हाइस अनेक भन्नाट फीचर्ससह पॅक्ड आहे. सीई नॉर्ड ब्रँडिंग अंतर्गत बड्स हे ब्रँडचे दुसरे TWS आहेत आणि बड्स, Z सिरीज आणि प्रो सह ब्रँड्समधील एकूण सहावे TWS आहेत. नवीन TWS, OnePlus Nord Buds CE १३.४ mm डायनॅमिक बेस ड्रायव्हर, जलद चार्जिंग सपोर्ट आणि २० तासांपर्यंत बॅटरी लाइफसह येतात . Buds CE ची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

वाचा: Redmi Buds 3 Lite स्वस्तात खरेदी करता येणार, मिळणार जबरदस्त ऑफ, उद्यापासून खास सेल

OnePlus Nord Buds CE: किंमत

OnePlus Nord Buds CE ची किंमत २,२९९ रुपये असून TWS मून लाईट व्हाइट आणि मिस्टी ग्रे रंग पर्यायांमध्ये येईल. वायरलेस इयरबड्सची विक्री भारतभरातील Flipkart, OnePlus.in आणि OnePlus स्टोअर्सवर ४ ऑगस्टपासून सुरू होईल.

वाचा: New Smartphone : नवीन स्मार्टफोन खरेदी करतांना ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, मिळेल बेस्ट डील

OnePlus Nord Buds CE मध्ये काय आहे खास ?

OnePlus Nord Buds CE हे सेमी इन-इअर स्टाइल डिझाइनसह येते. म्हणजेच ते, इंटरचेंजेबल इअरटिप्ससह येत नाही. आतील बाजुला , Nord Buds CE मध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी १३.४ mm डायनॅमिक बास ड्राइव्ह आणि ब्लूटूथ 5.2 आहे. OnePlus Nord Buds CE सक्रिय नॉइज कॅन्सलेशन चुकवत असताना हे बड्स मात्र कॉल्ससाठी AI नॉईज कॅन्सलेशनसह येतात. बड्स AAC आणि SBC फॉरमॅटला सपोर्ट करतात.

प्रत्येक बडमध्ये २७ mAh बॅटरी आणि केसमध्ये ३०० mAh बॅटरी आहे . एका चार्जवर, बड्सना ४.५ तासांपर्यंत संगीत प्लेबॅक किंवा ३ तास फोन कॉलपर्यंत रेटिंग आहे. एका चार्जवर Device नॉनस्टॉप २० तासांपर्यंत चालेल . Type-C पोर्ट द्वारे १० मिनिटे जलद चार्ज ८१ मिनिटे प्लेबॅक प्रदान करेल. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात IPX4 घाम आणि पाणी प्रतिरोधक रेटिंग, वन प्लस फास्ट पेअर, साउंड मास्टर इक्वलायझर आणि Hey Melody अॅप सपोर्ट समाविष्ट आहे.

वाचा: Smart TV Offers : अवघ्या १६ हजारात मिळतोय ४० इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही, इतर मॉडेल्सवर देखील मोठा ऑफSource link

Leave a Reply

Your email address will not be published.