मुंबई : जान्हवी कपूर काल रात्री एका इव्हेंटमध्ये गेली होती. सिताऱ्यांची ती मैफिल होती. ती बाहेर पडताच फोटोग्राफर्सनी तिला घेरलंच. जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. या लावण्यवतीचं मोहक सौंदर्य पाहून अनेकांना टायटॅनिक सिनेमातली अभिनेत्री केट विन्सलेट आठवली. या व्हिडिओतल्या एका छोट्या मुलीनंही सगळ्यांचं मन जिंकलं.

जान्हवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जान्हवीचं रूप चांगलंच खुललं आहे. जान्हवीचा हा अंदाज पाहून फॅन्सच्या हृदयाची धडधड नक्कीच वाढली आहे. लोक या लूकवर फायर इमोजी शेअर करत आहेत. आणि तिचं खूप कौतुक करत आहेत.

Malti Photo- प्रियांकाने दाखवली आई आणि मुलगी मालतीची झलक

काही फॅन्स बोनी कपूरच्या लेकीची तुलना टायटॅनिक सिनेमातलेया केट विन्सलेटशी करत आहेत. टायटॅनिकमध्ये केटनं गळ्यात घातलेला नेकपिससारखा जान्हवीनंही घातला आहे. शिवाय जान्हवी सगळ्यांशी खूप प्रेमानं वागत आहे. तिच्या या लोभस स्वभावाचंही कौतुक होत आहे.

जान्हवी आपल्या कारकडे जात असताना, एकानं आपल्या छोट्या मुलीची तिच्याशी ओळख करून दिली. जान्हवीनं तिची दखलही घेतली. त्यानंतर दोघींनी एकत्र फोटोही काढले.

बूट घालून मंदिरात शिरताना दिसतोय रणबीर, नेटकऱ्यांचा राग अनावर

जान्हवी कपूर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार करणचं दिग्दर्शन असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या तिघी जणी पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहेत. इतकंच नाही तर या तिघी एक डान्सही करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


जान्हवी कपूर फिटनेससाठी नियमित जिममध्ये जाते. मध्यंतरी तिचे जिममधले व्हिडिओही व्हायरल झाले होते.

‘चला हवा येऊ दया साठी ‘कियारा-वरुणचा मेट्रो प्रवास

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.