मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफ पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. जॅकी एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. या वेब सीरिजमधील जॅकी यांचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जॅकी यांचा जबरदस्त लूक पाहून युझर्सही हैराण झाले आहेत. कारण याआधी त्यांनी जॅकी यांना या अंदाजात कधीच पाहिलेलं नाही.


जॅकी कोणत्या वेब सीरिजसाठी चित्रीकरण करत आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु या सीरिजमध्ये त्यांचा लूक एकदम वेगळा आहे. सोशल मीडियावर त्यांचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये जॅकी यांचे लांब केस दिसत आहे. तसंच त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले असून सिगारेट ओढताना ते दिसत आहेत. जॅकी यांच्या या लूकवर या सीरिजमध्ये ते एकदम हटके भूमिका करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


दरम्यान, जॅकी यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर हमन बवेजा यांच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे बनवण्यात येणाऱ्या सिनेमात ते दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्याबरोबर सिकंदर खेर, मधुर मित्तल आणि मीता वशिष्ठ हे कलाकार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे पास बाप सारखा बिग बजेट सिनेमा देखील आहे. त्यात संजय दत्त आणि सनी देओल दिसणार आहेत.

‘आई कुठे काय करते’मध्ये साजरी होणाऱ्या वटपौर्णिमेची चर्चा; संजनाचा स्पेशल लूक

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.