न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन विमानाद्वारे विविध राज्यात प्रवास करत असतात. बायडन विमानाच्या पायऱ्या चढताना अडखळल्याचे व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन डेलावेयर राज्यात सायकल चालवताना पडले. जो बायडन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पॅडलमध्ये पाय अडकल्यानं जो बायडन सायकलवरुन पडले. या घटनेत त्यांना कसलिही इजा झाली नाही. बायडन यांनी सायकलवरुन पडल्यानंतर बरा असल्याचं सांगितलं आहे. जो बायडन यांचा हा व्हिडिओ एका अमेरिकन पत्रकारानं ट्विटरवर शेअर केला आहे.

जो बायडन शनिवारी त्यांच्या पत्नी जिल बायडन यांच्यासह डेलावेयर राज्यातील रेहाबेथ बीचवर सहलीसाठी गेले होते. जो बायडन तिथं सायकलिंग करत होते. बायडन सायकलिंग करत असल्याचं पाहून त्यांचे काही समर्थक देखील तिथं पोहोचले होते. जो बायडन सायकल चालवत असताना त्यांचा पाय पॅडलमध्ये अडकला आणि ते खाली पडले. यावेळी जो बायडन यांनी टी शर्ट, शॉट्स आणि हेल्मेट घातलं होतं.
मान्सूनच्या पावसाचा कहर, २५ जणांचा मृत्यू, ६० लाख लोकांना पुराचा फटका

जो बायडन सायकलवरुन खाली पडल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक लगेचच तिथं पोहचले. सुरक्षा रक्षकांनी बायडन यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. बायडन यांना खाली कसं पडले असं विचारलं असता त्यांनी सायकलच्या पॅडलमध्ये पाय अडकला असल्याचं सांगितलं. जो बायडन सायकलवरुन पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलानं व्हिडिओ रीट्विट करत अजून किती दिवस रशियावर ठपका ठेवणार आहे, असा सवाल केला.
अकोल्यात पावसाची दमदार हजेरी, अंदाजानुसार ‘या’ तारखांना विदर्भात पावसाची शक्यता
जो बायडन यांनी यानंतर त्यांच्या समर्थकांशी आणि मीडियासोबत संवाद साधला. व्हाइट हाऊसमधील एका अधिकाऱ्यानं जो बायडन सायकल थांबवत असताना त्यांचा पाय पॅडलमध्ये अडकला आणि ते खाली पडले असल्याचं सांगितलं. जो बायडन यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे विमानामध्ये प्रवेश करत असताना पायऱ्या चढताना धडपडल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती.
सामना रद्द, मालिका बरोबरीत; पण तरीही रिषभ पंतने रचला विक्रम, असं नेमकं काय घडलं पाहा….

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.