झटपट पैशांच्या हव्यासापोटी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नाही. कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात एक असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ येथे राहणारा विनायक त्र्यंबक हा रेल्वेत होमगार्डमधून काम करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याला त्याचा मित्र धीरज जाधव भेटला. दोघांनी पैशांसाठी एक शक्कल लढवण्याचे ठरवले. विनायक होमगार्ड असल्याने खाकी कपड्यामुळे तो पोलीस नसल्याचा कुणाला संशय येणार नाही असा त्यांनी विचार केला. तसेच धीरजने स्वतः टीसी बनून वावरण्याचा निर्णय घेतला.
क्लिक करा आणि वाचा- आई-वडिलांची हत्या करून तो दोन दिवस मृतदेहांसोबत होता, टिटवाळ्यातील धक्कादायक प्रकार
या दोघांनी कल्याणहून वाराणसीकडे जाणारी एक्स्प्रेस पकडली. मेल सुरू होताच दोघांनी पोलीस आणि टीसी असल्याची बतावणी करत प्रवाशांकडे पैशांची मागणी केली. काही जणांनी पैसे दिल्यानंतर त्यांचा हुरूप वाढला. त्यांनी आणखी काही जणांना धाक दाखवत पैशांची मागणी केली. काही प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे पावती आणि ओळखपत्र मागितले. मात्र हे दोघे गडबडले. प्रवाशाला संशय आल्याने त्यांनी याबाबत रेल्वे हेल्पलाईनला फोन करत माहिती दिली.
क्लिक करा आणि वाचा- बेचव चहा दिल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाची हत्या
रेल्वे पोलीस कसारा येथे गाडीत शिरले. मात्र विनायक व धीरज यांनी इगतपुरी येथे उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कल्याण रेल्वे पोलिस पाठलाग करत या दोघांमधील विनायक याला पकडले. तर झटापटीत धीरज पळून जाण्यात यशस्वी ठरला. या दोघांविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार धीरजचा शोध घेत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- केतकी चितळेच्या अडचणीत वाढ?; अॅट्रोसिटी प्रकरणात १६ जूनला सुनावणी