Protein foods for weight loss : वजन कमी करणे हे अवघड काम आहे यात काही शंकाच नाही. अनेकदा असे दिसून येते की लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात आणि कॅलरीज कमी करतात, तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. तज्ज्ञांचे मत आहे की वजन कमी करण्यासाठी जेवढी कसरत आवश्यक आहे, तेवढीच आहाराचीही गरज आहे. निरोगी मार्गाने वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यायामासोबतच त्या सर्व गोष्टींचे सेवन करणे, ज्यात कॅलरीज कमी आहेत आणि स्नायूंच्या वाढीस (muscles growth) चालना मिळते. यासाठी प्रथिने हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खूप महत्वाची आहेत.

यामुळे स्नायू मजबूत होतात, बॉडीमध्ये उजळपणा येतो आणि वजन कमी होते. आता प्रश्न असा येतो की प्रथिनांचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत आणि चांगली फिगर मिळवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश कसा करावा? यासाठी Detoxpri च्या फाउंडर अँड हॉलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर आपल्याला अशा डिशेस सांगत आहेत ज्या हाय प्रोटीन आहेत व वजन कमी करण्यासाठी जबरदस्त कामी येतील.

स्टिर फ्राय व्हेजिटेबल

हे विविध पौष्टिक भाज्यांचे मिश्रण आहे, जे खाल्ल्याने तुम्हाला प्रोटीनसोबतच विविध पोषक तत्वे मिळतील. ही लो-कॅलरी इंडो-चायनीज डिश असून इतर कोणत्याही रेसिपीपेक्षा वेगळी आहे आणि तुमची भूक अगदी लगेच भागवेल. यामध्ये भाज्या थोड्याश्या तेलात तळून स्टर फ्राय केल्या जातात आणि मसाले टाकले जातात. शिवाय यात पनीर घालायला विसरू नका. (फोटो क्रेडिट्स : TOI)

(वाचा :- कॅन्सर, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, खराब पाचन यासारख्या भयंकर आजारांचा धोका कमी करते हे 1 फळ, खा व प्रोटेक्ट व्हा)

रोस्टेड कोबी

कोबीमध्ये भरपूर पोषक तत्व आणि चरबीचे प्रमाण कमी असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली भाजी आहे. फक्त ते जास्त तेल आणि मसाल्यात बनवू नये. तसेच त्यात बटाटे घालणे कटाक्षाने टाळावे.

(वाचा :- वेटलॉस व रक्ताचा एक एक थेंब शुद्ध होतो, घाण व विषारी घटक साफ होतात व 7 गंभीर आजार दूर करते ही स्वस्तातील भाजी)

स्क्रॅम्बल एग

अंडी ही चवीसोबतच उच्च प्रथिनांचा (high protein) उत्तम आणि स्वस्त स्रोत आहे यात काही शंकाच नाही. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही नाश्त्यात अंड्यांचा समावेश करू शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला फक्त काळी मिरी, दूध, अंडी आणि बटरची गरज आहे. अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही आणखी भाज्या देखील यामध्ये घालू शकता. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- पोटात मुरड व पिळा बसणं, जुलाब, पोट साफ न होणं, पोटदुखीसारखे 6 वेदनादायी रोग होतील दूर, खायला घ्या ‘हे’ 7 पदार्थ)

बेक्ड चिकन सीख

ही मुगलाई रेसिपी प्रोटिनमध्ये जास्त आणि कॅलरीजनी कमी आहे. ते बनवण्यासाठी जास्त तेल वापरू नका. फक्त बेकिंग किंवा शेकवल्याने काम होईल. यामुळे तुमची काहीतरी खाण्याची क्रेविंगच शांत होणार नाही तर वजनही नियंत्रणात राहील. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- तब्बल 206 हाडांमध्ये ठासून कॅल्शियम भरतील या 6 स्वस्तातील गोष्टी, म्हातारपणापर्यंत हाडांना धक्काही लागणार नाही)

स्प्राउट चाट

दुसरी जलद आणि सोपी रेसिपी म्हणजे स्प्राउट्स चाट. तुम्ही राजमा, मूग डाळ आणि काळे चणे मिक्स करून बनवू शकता. त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून लिंबाचा रस मिक्स करा.

(वाचा :- Heart Attack symptoms : भयंकर, हार्ट अटॅक येण्याआधी कानात दिसतात ‘ही’ लक्षणे, आधीच समजून घेतल्यास वाचेल जीव..!)

क्विनोआ सॅलेड

क्विनोआ, थोडी बाजरी, राजमा आणि काही भाज्या एकत्र करून सॅलड बनवा. हे मिश्रण प्रोटीन आणि फायबरचा खजिना आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी अधिक चांगला ठरू शकतो. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- गुडघेदुखी, थायरॉइड, हार्ट स्ट्रोक, वेटलॉस, पोट साफ होण्यासाठी व वाढतं वय रोखण्यासाठी फक्त रोज प्या हे पाणी…!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.