मलायका अरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) हे असे कपल आहे जे जिथे जाते तिथे सर्वांना आकर्षित करते. त्यांच्यातील केमिस्ट्री असो दोघांची फॅशन आणि स्टाईल असो ही जोडी एकदम हटके आणि क्युट आहे हे तुम्ही देखील नक्कीच मान्य कराल. जेव्हा अरबाज खानशी (arbaaz khan) घटस्फोट घेऊन मलायकाने अर्जुनचा हात पकडला, तेव्हा दोघांवर खूप जास्त टीका झाली होती. याचे कारण म्हणजे दोघांमध्ये असलेले वयाचे अंतर होय. शिवाय मलायका एका मुलाची आई आहे आणि त्यामुळे तिने असे अफेअर करणे आपल्या समाजाने चुकीचेच ठरवले.

पण मलायका ती अरबाज सोबत ज्या रिलेशनशिपमध्ये होती त्यात तिला किती त्रास झाला आणि अर्जुनमध्ये तिने एक उत्तम जोडीदार का पाहिला याची कहाणी सांगितली आणि तेव्हा जगाला कळले की दोघांचे रिलेशनशिप म्हणजे केवळ आकर्षण नसून खरे प्रेम आहे. आता एवढी वर्षे एकत्र राहून मलायका आणि अर्जुन दोघांनी ही गोष्ट सिद्ध देखील केली आहे.

स्टायलिश जोडी

त्यांच्या प्रेमाबद्दल आणि बॉन्डीन्गबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच ठरेल. पण एक अशी गोष्ट आहे जी वळून वळून या दोन कपल्सकडे पहायला लावते आणि ती म्हणजे दोघांची हटके स्टाईल होय. दोघेही फिल्म इंडस्ट्रीमधले आणि त्यातही बॉलीवूड मधीलच, त्यामुळे फॅशन, स्टाईल, ग्लॅमर हे शब्द तर अगदी लहानपणापासूनच त्यांच्या कानावर पडत आलेले आहेत. म्हणूनच दोघांना सुद्धा स्वत:ला कसे प्रेझेंट करायचे आणि कुठेही गेल्यावर लाईमलाईट कशी खेचून घ्यायची याचे अगदी योग्य ज्ञान आहे.

(वाचा :- कशाला हवे डीप व बोल्ड ड्रेस, ब्लॅक ट्रान्सपरंट साडी व बोल्ड ब्लाउजमध्ये जान्हवी कपूरचा राडा, फिगरवर लाखो घायाळ)

लव्ह बर्ड्सनी इव्हेंटमध्येच पाडला प्रेमाचा पाऊस

आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दोघांच्या स्टाईल आणि केमिस्ट्रीचा एक गोड असा किस्सा जो नुकताच घडला. तर इंडियन फॅशन डिजाईनर कुणाल रावतच्या शो मध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी अर्जुनने एक मस्त रॅम्प वॉक करून सगळ्यांचीच वाहवा लुटली आणि या टाळ्या वाजवणा-ा प्रेक्षकांमध्ये मलायका अरोरा सुद्धा होती. ती केवळ त्याला सपोर्टच करत नव्हती तर त्याचा व्हिडीओ सुद्धा बनवत होती. आपल्या गर्लफ्रेंडला आपल्यासाठी एवढे आनंदी पाहून अर्जुनने सुद्धा मलायकाला भर शो मध्ये फ्लाईंग कीस दिला आणि तिच्या चेहऱ्यावरवर गोड हास्य उमटले.

(वाचा :- अरबाजची एक्स वाईफ मलायकाच्या बोल्डनेसला लावली गर्लफ्रेंड जॉर्जियाने कात्री, छोटासा स्कर्ट घालून पेटवलं वातावरण)

मलायकाचा हॉट लुक

या खास इव्हेंटमध्ये सुद्धा मलायकाचा अगदीच हॉट लुक दिसून आला. तिने Electrum कलरचा थ्री पीस सेट परिधान केला होता, ज्यामध्ये बोल्डनेसचा टच जबरदस्त पद्धतीने अॅड केला गेला होता. या सेटमध्ये बस्टियरला कव्हर करणारा एक टॉप होता आणि सोबतच मॅचिंग स्कर्टसोबत ब्लेझर सुद्धा दिसत होते. हे आउटफिट मोनोटोन लुकमध्ये होते. ज्यात टेक्सचर्ड पॅटर्न पाहायला मिळत होते. मलायका या आउटफिटमध्ये खूपच सेक्सी दिसत होती.

(वाचा :- न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल झालेल्या रणवीरचं अजून एक क्लासी फोटोशूट समोर, नेटकरी म्हणाले, ‘तुझ्याकडे कपडेही आहेत तर..’)

छोट्याश्या स्कर्टमध्ये लेग्स केले फ्लॉन्ट

स्टायलिश दिसणारा हा सेट मलायकाने इंडियातील फेमस फॅशन डिजाईनर कुणाल रावकच्या कलेक्शनमधून पिक केला होता. ज्यामध्ये Godet Skirt सोबत तिने ब्रालेट टॉप आणि कोट परिधान केला होता. स्कर्टचा पॅटर्न अप्पर थाय पोर्शनपर्यंत लांब होता, ज्यात तिचे स्मूथ लेग्स एकदम मस्त फ्लॉन्ट होत होते. शिवाय सोबतच तिने अटायरला स्कीनी फीट ठेवले होते, आणि तिच्या बॉडीला ते कॉम्पलिमेंट सुद्धा करत होते. मलायकाने या स्टायलिश लुकमध्ये बोल्डनेसचा तडका लावण्यासाठी आपले क्लोथ्स पूर्णपणे हायलाईट होऊ दिले होते. ज्यात डीप कट नेकलाईन उत्तम पद्धतीने शो होत होती.

(वाचा :- छोटासा टॉप व शॉर्ट पॅंटमध्ये प्रियांका चोप्राने माजवला सोशल मीडियावर कहर, मालती मेरीच्या आईची फिगर बघून चाहत्यांना चक्कर)

असे केले स्वत:ला स्टाईल

कर्वी फिगरचे वरदान लाभलेल्या मलायकाने केवळ अटायरच नाही तर हिल्स सिलेक्शन देखील अगदी विचारपूर्वक केले होते. तिने यावेळी ओपन टो हील्स परिधान केली होती. ज्यासह आपला लुक ज्वेलरी फ्री ठेवला होता. मलायकाने आपला मेकअप टोन न्यूड ठेवला होता, तर केसांना स्लीक एंड स्ट्रेट लुकमध्ये स्टाईल केले होते. ग्लॅमरस मलायकाची क्युट स्माईल आणि सेक्सी अंदाज तिच्या एकंदर लुकला परफेक्ट फिनिशींग देत होता.

(वाचा :- आजवरील सर्वात बोल्ड व सेक्सी ब्लॅक ट्रान्सपरंट ब्रालेट घालून मलायका अरोराचा रॅम्प वॉक, चाहत्यांना फुटला दरदरून घाम)

अर्जुनने मलायकाला दिला फ्लाइंग किस..!

मलायकाचा सुपरबोल्ड लुक..!

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.