मुंबई : ‘टाइमपास ३’ (Time Pass 3) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे चा डॅशिंग अंदाज आणि प्रथमेश परब नं साकारलेला दगडू प्रेक्षकांना आवडला आहे. असं असलं तरी सिनेमातील एका दृश्याला आक्षेप घेण्यात आला असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. मराठी एकीकरण समितीनं आक्षेप घेतला असून ते दृश्य सिनेमातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर सिनेमाच्या दिग्दर्शकांनी यासंदर्भात माफी मागावी, अशी मागणी देखील केली आहे.

विवेक- तन्वीच्या रील्सची हवा! या Video ला मिळाले १६ कोटी व्ह्यूज

या संदर्भात मराठी एकीकरण समितीनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, ‘रवी जाधव तुमच्या चित्रपटात हिंदी राष्ट्रभाषा अशी खोटी माहिती दाखवण्यात आली आहे. राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात. चित्रपटातील हे दृश्य तातडीनं काढून टाकावं. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा’ असं म्हणत त्यांनी रवी जाधव, प्रियदर्शन जाधव, प्रथमेश परब, संजय नार्वेकर यांना टॅग केलं आहे.

‘टाइमपास ३’ हा सिनेमा २९ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेत्री हृतानं पालवीची भूमिका साकारलीय तर अभिनेता प्रथमेशनं दगडूची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. दरम्यान, मराठी एकीकरण समितीनं केलेल्या या आरोपांवर टाइमपास ३ सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडून किंवा सिनेमाच्या कोणत्याही टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता या गोष्टीचा ‘टाइमपास ३’ सिनेमावर काही परिणाम होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मोदींनी केलेल्या विधानावर अभिनेत्याने विचारला प्रश्न, झाला ट्रोल

सिनेमाची बॉक्स ऑफिसवर कमाई किती

‘टाइमपास ३’ सिनेमाच्या यशाविषयी सांगायचं झालं तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करत आहे. सिनेमानं पहिल्याच दिवशी ८० लाख रुपयांची कमाई केली. सिनेमाचं एकूण बजेट १० कोटी रुपये असून पहिल्याच आठवड्यात सिनेमानं १ कोटी १० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा ४०० स्क्रिन्सवर १० हजार शोजसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.