मुंबई :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) बीकेसीतील सभेत भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. मुंबई आम्ही ओरबडत बसलो असतो तर मराठी आणि इतर भाषिक समुदाय इथं पोहोचला नसता. अनेक गोष्टी आहेत, या गोष्टी आपण बोलून सांगयाला पाहिजेत. आता पुन्हा एकदा सांगतो आमची २५ वर्ष युतीत सडलो. हाच का आमचा मित्र ज्याला २५ वर्ष सोबत घेतला होता. आमच्या सामनामध्ये जे येतं ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचं असतं. संजय राऊत यांचा एक लेख काढून दाखवा ज्यात आम्ही नरेंद्र मोदींचा अपमान केला असेल, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा, बीकेसी मैदानात राज्यभरातून शिवसैनिक दाखल

अटल बिहारी वाजपेयी पेट्रोलचे दर ७ पैसे वाढले म्हणून संसदेत बैलगाडीतून गेले होते. ती संवेदनशीलता कुठं गेली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत भाजपची रामभाऊ म्हाळगी संस्था आहे. त्या ठिकाणी भाजप नेते चिंतन आणि कुंथन करतात. रामभाऊ म्हाळगीमध्ये शिकलेले कुठं गेले आहेत, ते दिसत नाहीत. विनय सहस्त्रबुद्धे दिल्लीत गेले आहेत, तिथं काय शिकवतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदुत्त्वात बसतं. आपल्या हिंदुत्त्वात बसत नाही.

काश्मिरी पंडित राहुल भट याला कार्यालयात घुसुन गोळ्या घातल्या. काय करायचं आपण तिथं हनुमान चालीसा म्हणायचं का? काश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यायला हवी होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही महागाईवर का बोलत नाही. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु झाला आहे. आपल्या रुपयाचा अमृतमहोत्सव झाला आहे.

शेवटी गाढव ते गाढव, आम्ही त्यांना लाथ मारली; फडणवीसांच्या ‘गदाधारी’ला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
संंभाजीनगर जे घडलं, त्याचं नामांतर करण्याची गरज काय? ते संभाजीनगर आहे. ओवेसी येऊन गेला. संजयजी तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. ए टीम, बी टीम, सी टीम त्यांच्यावर कारवाई झाली तर त्यांच्यावर होईल. आम्ही टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. टीनपाट लोकांना वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा देत आहात. गळक्या टीनपाटांचा तुम्हाला काय उपयोग आहे., अशा पद्धतीचा कारभार सुरु आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.