राजकोट : मालिकेत पुनरागमन कसे करायचे, याचा उत्तम वस्तुपाठ भारताच्या संघाने दाखवून दिला. युवा फलंदाजांना लाजवेल अशी दिनेश कार्तिकची वादळी अर्धशतकी खेळी आणि अवेश खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या सामन्यात ८२ धावांनी दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे.

भारताच्या गोलंदाजांपुढे आफ्रिकेचे लोटांगण
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना यावेळी भारताच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घालावे लागले. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि त्यामुळेच भारताला या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आला. भारताकडून अवेश खानने तिखट मारा करत चार बळी मिळवले आणि दक्षिण आफ्रिकेला पराभवाच्या दरीत ढकलले. युजवेंद्र चहलने दोन विकेट्स मिळवत त्याला सुयोग्य साथ दिली.

भारताने कसा उभारला धावांचा डोंगर, पाहा…
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. भारताला सलामीवीर ऋतुराजच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला पाच धावाच करता आल्या. आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात श्रेयस अय्यर अपयशी ठरला होता. त्यामुळे या सामन्यात तो कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण श्रेयस पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला फक्त चार धावाच करता आल्या. एकिकडे भारताच्या दोन विकेट्स पडल्या असल्या तरी इशान किशन मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. इशानच्या खांद्यावर भारताच्या धावगतीची जबाबदारी होती. पण इशान २७ धावांवर बाद झाला आणि भारताची धावगती मंदावली. त्यानंतर मैदानात रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे कर्णधार व उपकर्णधार खेळत होते. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देईल असे वाटत होते. पण मोठा फटका मारण्याच्या नादात इशानचा झेल उडाला. पण केशव महाराजने त्याचा झेल सोडला आणि त्याला १५ धावांवर असताना जीवदान मिळाले. पण या जीवदानाचा फायदा पंतला उचलता आला नाही. कारण त्यानंतर पंतने फक्त दोन धावा केल्या आणि १७ धावांवर तो बाद झाला. भारतीय संघ आता जास्त धावा उभारणार नाही, असे काही जणांना वाटत होते. पण यावेळी दिनेश कार्तिक संघाच्या मदतीला धावून आला. कार्तिकने यावेळी २७ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची वादळी खेळी साकारली. कार्तिकला यावेळी हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. हार्दिकने यावेळी ३१ चेंडूंत ४६ धावांची खेळी साकारलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.