हिंगोली : हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी हिंगोलीची सूत्रे सांभाळताच जोरदार फील्डिंग सुरू केली आहे. हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्रभर शिवसेनेला गळती लागलेली असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र शिवसेनेत पहिली इनकमिंग होत आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारताच बबनराव थोरात यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

राष्ट्रीय पक्षाचा माजी आमदार सेनेत?

पूर्वी हिंगोली जिल्ह्याचे संपर्क मंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळात शिवसेनेला जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळाले होते. राज्यात स्वबळावरील शिवसेनेची ही त्या काळात पहिली जिल्हा परिषद ठरली होती. बबनराव थोरातांना खानदेशात कामगिरीवर पाठवल्यामुळे हिंगोलीची जबाबदारी आनंदराव जाधव यांच्यावर सोपवली गेली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आनंदराव जाधव यांच्या जागी परत बबनराव थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर रविवारी ते प्रथमच हिंगोलीत दाखल झाले, तत्पूर्वी त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या, याचाच एक परिणाम म्हणून एका राष्ट्रीय पक्षाचा माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे तीन राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राजकीय वर्तुळाची उत्सुकता ताणली गेली.

हेही वाचा : राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांच्या कॅशवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, बंधू सुनील राऊतांचा आरोप

काँग्रेसच्या माजी आमदाराचं नाव चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्यांच्या शिवसेनेतील पदांच्या रिक्त जागा भरण्याची पक्षाला कोणतीच घाई दिसत नाही. शिवसेनेला आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात कोणता उमेदवार उतरवायचा याचीच जास्त चिंता दिसत आहे. प्रवेश उत्सुकतांचाही यावर डोळा दिसत आहे. यामुळे रोज नवनवीन नावं चर्चेत येत आहे. कळमनुरी मतदारसंघात अजित मगर यांच्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. अजित मगर यांनी चाचणी करूनही कोणताच निर्णय घेतलेला नसताना अचानक आमदार संतोष टारफे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : संजय राऊतांची संपत्ती नेमकी किती? पत्नी वर्षा किती श्रीमंत? जाणून घ्या

संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचा मेळावा असून मेळाव्यामध्ये आज शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन दिवसात नवा जिल्हाप्रमुख हिंगोलीसाठी देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते, मात्र अद्यापही त्याची निवड झाली नसून उलट जिल्ह्यासाठी नवीन संपर्कप्रमुख दिल्यामुळे सर्वजण संभ्रमात पडले आहेत. त्याचबरोबर मेळाव्यात शिवसेनेच्या गळाला काही इतर पक्षातील नेते लागतात का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : ठाकरेंशी एकनिष्ठ माजी मंत्री शिंदे गटात; मग काँग्रेसला मोठा धक्का कशामुळे?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.