मुंबई : ठाकरे कुटुंबियांचे फोटो बॅनरमधून काढले जातील पण आमच्या हृदयातून नाही. ठाकरे कुटुंबियांचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत राहिल, असं वक्तव्य शिंदे गटात गेलेले बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय. बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारुन ‘मातोश्री’ला पहिला दणका दिला. त्यानंतर औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे या पिता पुत्रांचा फोटो देखील हटवला. या सगळ्यावर भाष्य करताना प्रताप सरनाईक यांनी ‘ठाकरे कुटुंब’ आपल्या हृदयात शेवटपर्यंत असेल, असं म्हटलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांचे चिरंजीव माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. आदित्य यांच्याकडून बंडखोरांचा उल्लेख वारंवार ‘गद्दार’, असा केला जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदारांनी आता आपल्या कार्यालयामध्ये असलेले ठाकरे पितापुत्रांच्या तसबिरी हटवायला सुरुवात केली आहे. औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवला आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. मात्र, आता याच कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो शिरसाट यांनी हटवला आहे. या सगळ्यावर आज शिवसेनेच्या वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांना याप्रकरणी प्रश्न विचारला असता ठाकरे कुटुंबियांचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत राहिल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ज्या विचारांवर आम्ही मतं मागितली आणि लोकांनीही तो विचार समोर ठेवून आम्हाला मतं दिली, त्या विचारांचं सरकार सध्या राज्यात सत्तेवर आलेलं आहे. वृत्तपत्र-पॅम्प्लेट-जाहिराती यांमधून फोटो काढले जातात. पण हृदयातून फोटो काढले जात नाही. ठाकरे कुटुंबियांचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत राहिल, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

Shivsena: शिंदे गटाच्या आमदारांनी कार्यालयातून ठाकरे पितापुत्रांच्या तसबिरी हटवल्या, आदित्य ठाकरे म्हणाले…
बंडखोरांनी ठाकरेंचे फोटो हटवले, आदित्य ठाकरे म्हणतात….

आता बंडखोरांचा खरा चेहरा समोर यायला सुरुवात झाली आहे. गेले महिनाभर हे बंडखोर म्हणत होते की, आमचे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. आदित्य ठाकरे हे आमच्यासाठी मुलासारखे आहेत, असे बंडखोर सांगत होते. पण आता यांचा खरा चेहरा समोर यायला लागला आहे. गद्दार हे गद्दारच असतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

मातोश्रीविरोधात बंडाचं निशाण, पण घरी ठाकरे कुटुंबियांचे फोटो आजही दिमाखात, सोशल मीडियावर चर्चा
संजय शिरसाठांच्या कार्यालयातून उद्धव-आदित्यंचे फोटो हटवले, मात्र एकनाथ शिंदेंच्या घरात…

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने सगळी राजकीय गणिते बदलून गेली आहेत. जे कार्यकर्ते-नेते काल उद्धव ठाकरे यांना नेता मानत होते, ते आज उद्धव ठाकरे नेता आहेत की नाहीत, हे विचार करुन सांगावं लागेल असं म्हणतायेत. ठाकरे पिता पुत्रांच्या फोटोंशिवाय ज्या सेना नेते-कार्यकर्त्यांचा एक फ्लेक्स लागत नव्हता, आज त्यांच्या प्लेक्सवरुन उद्धव-आदित्य गायब झालेत. पण या सगळ्यात- ज्यांच्यासाठी म्हणून हे झालंय, त्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातील भितींवर अजूनही ठाकरे कुटुंबियांचे फोटो दिखामात आहेत. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.