ठाणे : या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या पुलाची मंगळवारी पाहणी करण्यात आली. तसेच हा पूल ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या स्थितीत या पुलाचा एक मार्ग ऑगस्ट महिना अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

ठाण्यातील ठाणे आणि कळव्याला जोडल्या जाणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे. हा कळवा खाडीचा पूल मे २०२२ पर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी आणि ठेकेदार कंत्राटदारांकडून या कामाला दिरंगाई झाल्यामुळे या पुलाचे काम लांबणीवर गेले आहे. पुलाच्या काही ठिकाणच्या जंक्शनच्या कामासाठी आणि गुंतागुंतीच्या पुलाच्या जंक्शनच्या रचनेमुळे या पुलाच्या कामाला उशीर होत असल्याचे अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत तिसऱ्या पुलाची मंगळवारी पाहणी केली. या पाहणीदरम्यान माळवी यांनी बांधकाम सुरू असलेल्या तिसऱ्या पुलाच्या पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आणि ताकिद संबंधित विभागाला आणि कंत्राटदार यांना दिली. त्यामुळे या महिना अखेरपर्यंत या पुलाची एक मार्गिका नागरिकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले.

ठाणे आणि कळवा दरम्यान ठाणे महापालिकेमार्फत बांधण्यात येत असलेल्या तिसऱ्या पूलाची एकूण लांबी २.४० किमी इतकी आहे. या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा चौक आणि ठाणे बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही संदीप माळवी यांनी दिला. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर ती वाहतुकीस खुली केल्यावर ठाणे – कळवा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होऊन पुलावरील खड्ड्यांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आव्हाडांनी पालिका प्रशासनाकडे केली होती मागणी

कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता जवळ-जवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतूक कोंडीने लोक हैराण झाले आहेत. कळव्यातील रस्त्यांवर खड्डे नसल्यामुळे अंतर्गत प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही. परंतु, ठाण्यात जाण्यासाठी कळवा पूल ओलांडावा लागत आहे. त्यातच ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा ताण कळव्यातील वाहतुकीवर पडत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण, त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम, विद्यार्थी आणि नोकरदारांना सहन करावा लागत आहे. यामध्ये समान्य नागरिकांची काहीच चूक नाही. त्यामुळे कमीत-कमी जो पूल तयार झाला आहे. तो नागरिकांच्या वापरासाठी सुरू करावा, जेणेकरुन थोडीफार वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी माजी गृहनिर्माण मंत्री तथा कळवा विभागाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पत्राद्वारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे पालिका प्रशासनाकडे केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.