सांगली: डाळिंबाच्या शेतामध्ये गांजाची शेती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून गांजाची शेती उध्वस्त केली आहे.एका शेतकऱ्यास अटक करत १३ लाख ४० हजार किंमतीचा १३३ किलो गांजा जप्त केला आहे.

जत तालुक्यातील माणिकनाळ या ठिकाणी एका शेतकऱ्याने गांजा शेतीची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने माणिकनाळ येथे जाऊन छापा टाकला. डाळिंबाच्या शेतीमध्ये गांजा शेती पिकवत असल्याचा समोर आले.

वाचा- TET गैरव्यवहार प्रकरणी ७ हजार ८८० जणांना दणका; सेवेत असलेल्यांवर देखील कारवाई

त्यावेळी पोलिसांना डाळिंब शेतात गांजा शेती पिकवण्यात आल्याचे समोर आले. ५ ते ७ फूट उंचीची ही गांज्याची झाडे होते. त्यानंतर पोलिसांनी बागेत असणारी सर्व गांज्याची झाडे उखडून काढत डाळिंब बागेतील गांजा शेती उद्धवस्त केली. या प्रकरणी महसिद्ध बगली यांना अटक केली आहे. तर या छाप्यात १३३ किलो वजनाची ७८ गांज्याची झाडे जप्त करण्यात आले असून,बाजारात १० हजार किलो दराने याची विक्री किंमत आहे.त्यानुसार एक लाख ४० हजार रुपयांचा हा गांजा आहे.

वाचा- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: अखेरच्या दोन टी-२० मॅच रद्द होणार? अडचणीत सापडले खेळाडू

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती करण्यात येत,यापूर्वी अनेक वेळा गांजा शेती उद्धवस्त देखील करण्यात आली आहे.तर पोलिसांच्याकडून कारवाई होत असली तरी गांजाची शेती लागवड ही अजूनही सुरूच आहे.शेजारी कर्नाटक राज्य असल्याने सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.