सिंधुदुर्ग : वैभववाडी मार्गावर मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर डंपर वाहनात झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सख्ख्या बहीण भावाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी सोनाळी वाणेवाडी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मुख्तार महंमद थोडगे (१८ रा. कोळपे ) व मोमीना उस्मानगणी नावळेकर (२२ रा. नांदगाव ता. कणकवली) अशी मृतांची नावे आहेत.

मुख्तार हा येथील अर्जुन रावराणे उच्च महाविद्यालयात १२वी विज्ञान विभागात शिकत होता. तर मोमीना ही विवाहित असून तिला दोन महिन्यांचा मुलगा आहे. मुख्तार हा बहिणीला घेऊन वैभववाडी येथे डॉक्टरकडे जात होता. त्यावेळी राजमार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतर मिक्सर वाहन चालक गाडी सोडून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताने राज्य मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

राऊतांचा अजितदादांच्या एक्क्यावर संशय, राजू शेट्टींचाही संताप, म्हणाले, ‘त्याला कधीच हाकललाय’
अपघातानंतर मिक्सर वाहन चालक गाडी सोडून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताने राज्य मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. वैभववाडी उंबर्डे मार्गावर आज सकाळी सिमेंट मिक्सर आणि मोटरसायकलचा अपघात झाला.याअपघातात कोळपेची बहिण भाऊ जागीच ठार झाली. हा अपघात एवढा भीषण होता की म‌ृत्यु पावलेल्या दोघांचेही मृतदेह ओळखता येत नव्हते. या अपघातात मृत्यू पावलेल्या मोमीना उस्मानगणी नावलेकर यांना दोन महिन्यांचा फिपान नावाचा मुलगा आहे.

बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन… राज्यसभा निकालानंतर सुप्रियांचा डायलॉग

दरम्यान, मोमीना हि आपल्या कोळपे येथील माहेरी गेली होती. तब्येत बरी नसल्याने ती भावाला घेऊन डॉक्टरकडे वैभववाडीला निघाली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. दोन वर्षा पूर्वीच नांदगाव येथील उस्मानगणी नावळेकर यांच्याशी मोमीनाचा विवाह झाला होता.मोमीनाने डेटा एन्ट्री आॅपरेटरची परिक्षाही दिली होती . मोमीनाच्या दुर्देवी मृत्यूने दोन महिन्यांचा फिपान आईच्या मायेला मुकला आहे. फिपानच आईसाठीच रडणं उपस्थितांना अस्वस्थ करणारं आहे..

नाचता येईना अंगण वाकडे, अशी शिवसेना आणि संजय राऊतांची अवस्था | चंद्रकांत पाटीलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.