मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेनिर्माता-दिग्दर्शक डेविड धवन (David Dhawan) यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. डेविड धवनचा मुलगा वरुण धवन त्याचा आगामी सिनेमा जुग जुग जियो (Varun Dhawan upcoming movie jugg jugg jeeyo) च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. डेविड यांना रुग्णालयात ठेवल्याची बातमी समजल्यानंतर वरुणनं सिनेमाचं प्रमोशन अर्धवट सोडून रुग्णालयाकडे धाव घेतली.

डेविड धवन यांना हाय डायबेटिस आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये सतत चढ-उतार होत असतात. डेविड धवन यांना नेमका काय त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, हे समजू शकलेलं नाही. दरम्यान, डेविड यांचा मुलगा आणि अभिनेता वरुण त्याचा आगामी सिनेमा जुग जुग जियोच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल केल्याचं समजल्यावर तो तातडीनं तिथं रवाना झाला आहे.

कोण आहेत डेविड धवन

डेविड धवन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक आहेत. त्यांनी कुली नंबर १, तेरा हीरो,जुड़वा, हसीना मान जाएगी, साजन चले सुसराल, जोड़ी नंबर 1 यांसारख्या अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. डेविड धवन यांना वरुण धवन आणि रोहित धवन अशी दोन मुलं आहेत. हे दोघंहीजण सिनेमा क्षेत्रातच कार्यरत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.