मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान. आमिर त्याच्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतो. परंतु आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर आमिरचा एका वेगळ्या लूकमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर त्याचा धाकटा मुलगा आझाद बरोबर दिसत आहे. आमिरला पाहून अनेक नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. काहींनी तर आमिरचा हा लूक रणवीर सिंगशी स्पर्धा करणारा आहे, असं म्हटलं आहे.

८ वर्षांचा दिसणारा अब्दु आहे १८ चा, आजारामुळे झाली अशी अवस्था

आमिर खान आणि त्याचा मुलगा आझाद यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर त्याच्या गाडीतून उतरून आझादबरोबर एका ज्वेलरी दुकानाकडे जाताना दिसत आहे. अर्थात हे दोघं पुढं जाऊन थांबले आणि त्यांनी तिथं असलेल्या फोटोग्राफर्सना पोझ दिल्या.


मात्र, यावेळी आमिरचा लुक नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही. त्यावर अनेकांनी मजेशीर कमेन्ट केल्या आहेत. काहींनी तर त्याला चक्क जोकर म्हटलं तर एका युझरनं लिहिलं आहे की, ‘हे जे तू घातलं आहे ते कोणत्या बायकोकडून उधार आणलं आहेस.’ तर अनेकांनी आझादचं भरभरून कौतुक केलं आहे. तो अगदी सेम आमिरसारखा दिसत असल्याचं काहींनी म्हटलं आहे, तर काहींनी आझादला हॅरी पॉटर म्हटलं आहे.

मालदिवहून परतल्यावर थेट हाॅस्पिटलमध्ये गेले अनुष्का आणि विराट, नक्की असं काय झालंय?

दरम्यान आमिरच्या कामाबद्दल सांगायचं तर ११ ऑगस्ट २०२२ त्याचा लाल सिंह चढ्ढा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यानं केलं आहे. हा सिनेमा हॉलिवूडमधील ‘फॉरेस्ट गम्प’ सिनेमाचं हिंदी रूपांतर आहे. या सिनेमाची आमिरचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.