मुंबई :तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) नं #MeToo मूवमेंटवेळी नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये एकदच गदारोळ उठला होता. आता हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर हा वाद मागं पडलं. परंतु पुन्हा एकदा तनुश्रीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नाना पाटेकर यांच्यावर नव्यानं आरोप केले आहेत.

बिपाशा बासूनं दिली गुड न्यूज, लग्नानंतर सहा वर्षांनी आहे प्रेग्नंट

पुन्हा एकदा नाना पाटेकरांवर निशाणा

तनुश्रीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक प्रदीर्घ पोस्ट लिहिली. या पोस्टमधून तिनं तिच्यावर झालेल्या अत्याचारांबाबत लिहिलं आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं की, ‘जर मला काही झालं तर त्याला नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि टीम तसंच त्यांचे बॉलिवूडमधील माफिया मित्र जबाबदार असतील. बॉलिवूड माफिया कोण आहेत? सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सातत्यानं ज्या व्यक्तींची नावं समोर येत आहेत. (या सगळ्यांचे वकील सारखेच होते.)’


बॉलिवूड माफियांवर बहिष्काराचं आवाहन

तनुश्रीनं याच पोस्टमध्ये सर्वांना एक आवाहन केलं आहे. तिनं या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘अशा बॉलिवूड माफियांचे सिनेमे पाहू नका. त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाका. कलाक्षेत्रातील काही लोकांनी आणि पत्रकारांनी माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या. ज्यांनी मला खूप त्रास दिला त्या सर्वांचं जीवन नरकासारखं बनवा कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. कायदा आणि न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही तरी माझा देशातील नागरिकांवर खूप विश्वास आहे. जय हिंद! पुन्हा भेटू या!’


नाना पाटेकरांना मिळाली क्लिनचीट

दरम्यान, तनुश्रीनं पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. या दोघांनी २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवर नाना यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप करत तनुश्रीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. परंतु त्यानंतर काहीच पुढं झालं नाही. या प्रकरणानंतर तनुश्री सिनेसृष्टीतून गायब झाली. ही गोष्ट २०१८ मध्ये उघडकीस आली. परंतु त्यावेळी पाटेकर यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २०१९ मध्ये पोलिसांनीही नानांना क्लिनचीट दिली होती.

सलमान खान वापरतोय बुलेटप्रूफ कार, हत्येच्या धमकीनंतर वाढवली अशी सुरक्षा


तनुश्रीवरच होतेय टीका

तनुश्रीनं नाना पाटेकरांबद्दल पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘तुला पुन्हा एकदा प्रसिद्धी हवी आहे का?’ असा प्रश्न तिला विचारला जात आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.