मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेन (Dayaben Comeback in Taarak Mehta ka Ooltah Chashmah) कोण साकारणार या प्रश्नाचं उत्तर मिळावं यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. कारण दररोज या व्यक्तिरेखेशी संबंधित नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. याआधी शोचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांचे विधान होते की लवकरच दयाबेनची एंट्री होणार आहे. त्यावेळी चाहत्यांना वाटले की दिशा वकानी (Disha Vakani) पाच वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर परतते आहे की काय? त्यामुळे चाहत्यांना आनंदही झाला होता. पण अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर ही गोष्ट नाकारली होती आणि तिच्या आगमनाच्या वृत्ताला पूर्णविराम मिळाला. यानंतर दयाबेनच्या भूमिकेत राखी विजन (Rakhi Vijan) दिसेल असेही वृत्त समोर आले होते, पण आता आठवडाभरानंतर अभिनेत्रीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ही देखील अफवा असल्याचे समोर आले आहे.

हे वाचा-अमिताभ बच्चन यांच्यासाठी पोस्ट करताना मुलगी श्वेताकडून चूक, अभिषेकनेच केलं ट्रोल!

राखी विजन हा तसा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. एकता कपूरच्या ‘हम पांच’मधून तिने प्रेक्षकांना हसवले होते आणि त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. मात्र, ती अनेक काळापासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. पण काही दिवसांपूर्वीच मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की ती टीव्हीवर पुनरागमन करतेय.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनच्या भूमिकेसाठी राखी विजनला संपर्क करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र याविषयी ठोस माहिती मिळाली नव्हती. आता राखीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून या दाव्यांना निव्वळ एक अफवा म्हटलं आहे.


दयाबेनविषयी काय म्हणाली राखी?
राखी विजनने अशी पोस्ट केली आहे की, ‘सर्वांना नमस्कार, ही बातमी अफवा आहे, ज्यामुळे मला धक्का बसला आहे. वाहिनी किंवा निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला नाही.’ तिने ही पोस्ट करताना ती दयाबेन साकारत असलेल्या वृत्ताचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

हे वाचा-‘भूल भुलैया २’ने कमावले 180 कोटी तरी कार्तिक खातोय रस्त्यावरचं खाणं, Video Viral

दरम्यान लोकांनी यावर प्रतिक्रियाही द्यायला सुरुवात केली आहे. राखीला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असल्याचे पाहायला मिळते आहे. एकाने लिहिले आहे ‘का नाही? तुम्ही उत्तम कलाकार आहात. पण आता स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद.’ क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रिया रैनानेही राखीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने लिहिले की, ती काही क्षणांसाठी खूप आनंदी झाली होती. एका चाहत्याने तर म्हटले की मूळ दया बेनची जागा घेणारी ती एकमेव आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.