अहमदनगर : परराज्यातून गावठी शस्त्रे आणायची, नगर जिल्ह्यात ग्राहक शोधून त्यांना ती विकून दुप्पट नफा कामवायचा अशा पद्धतीने गुन्हे करणारी एक टोळी पोलिसांनी पकडली आहे. पोलिसांना गुंगारा देत सोबत मोठा शस्त्रसाठा घेऊन जणून चालतफिरते दुकानच ही टोळी चालवित होती. पोलिसांना माहिती मिळाल्यावर श्रीरामपूर येथील एका हॉटेलच्या वाहनतळात सापळा रचून पोलिसांनी यातील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल आठ गावठी कट्टे आणि दहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. (police caught a gang selling weapons)

जिल्ह्यासह राज्यात अवैध शस्त्र बाळगणे आणि त्यांच्या मदतीने गुन्हे करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावर यासंबंधीची मोहीम सुरू आहे. नगर जिल्ह्यातही अशी मोहीम सुरू असून गेल्या सहा महिन्यात ३९ बेकायदा शस्त्र पकडण्यात आली आहेत.

क्लिक करा आणि वाचा- शनिशिंगणापूरचा चौथरा खुला; ५०० रुपये शुल्क आकारणार

श्रीरामपूरमध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईत राहुलसिंग फत्तूसिंग कलानी (वय २५) आकाश बादलसिंग जुनी (वय २२) व अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (वय २०, रा. श्रीरामपूर) या तिघांना अटक करण्यात आली. हे तिघे शहरातील हॉटेल राधिकाच्या वाहनतळात गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आले होते. सथानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने त्यांना अटक केली. सुमारे दोन लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांयाकडून हस्तगत करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- आता रोहित पवारांचे ‘गंगाजल अभिषेक’ अभियान, तीर्थक्षेत्रांबाबत सुचली ‘ही’ कल्पना

गुन्हे शाखेच्या पोलिसांना या टोळीसंबंधी माहिती मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूरमधील हॉटेल राधिकाजवळ पोलिसांना सापळा रचला. काही वेळातच दाढी वाढलेले तिघे जण तेथे चालत आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांना घेरण्यात आले. सुरवातीला त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे आठ कट्टे आणि दहा काडतुसे आढळून आली.

क्लिक करा आणि वाचा- बंदमध्ये सहभागी न झालेल्या दुकानदाराला बुलडोझर चालविण्याची धमकी

त्यांनी ही शस्त्रे परप्रांतातून आणली आहेत. त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना मिळाला आहे. ते येथे ज्यांना शस्त्र विकणार होते, त्यांची नावेही पोलिसांना मिळाली आहेत. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकानेही अशा पद्धतीच्या कारवाया केल्या आहेत. एका गुन्ह्यात पोलिसांनी थेट मध्यप्रदेशातील अशा एका बेकायदा शस्त्र कारखान्यापर्यंत धडक मारली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.