सांगली: ‘आय लव्ह यू म्हणायचं आणि लफडी करायची, हे चालतचं’, अशा शब्दात शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील खेचाखेचीवर मिश्किल टोलेबाजी केली आहे. तसेच, उद्धव ठाकरे आपला इंजिन आणि आपण त्याचा डबा आहोत, असे ही मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

हेही वाचा –आमच्यासाठी भाषण महत्त्वाचं नाही, वारकऱ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका : दरेकर

सांगली जिल्हा दौऱ्यावर असणारे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आघाडीमधल्या खेचाखेचीवर मिश्किल टोलेबाजी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील आघाडी सरकारमधील तणाव आणि नेत्यांच्या नाराजीवरून बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, तीन पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे तुम हमारी खेचो, हम तुम्हारे खेचेंगे, चालणारचं आहे.

हेही वाचा –मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणापासून रोखलं, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘हा तर अपमान’

प्रत्येक जण आप-आपल्या पक्षाचा विचार करतो. तसा मीही आपल्या पक्षाचा विचार करतो. ज्या पक्षाचा मी मंत्री आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करणे हे माझे कर्तव्य आहे. तसचे, मागे भाजपा-सेनेची युती होती, तिथेही अशी खेचा-खेची व्हायची. “आय लव्ह यू” म्हणायचं, नंतर लफडी करायची, हे चालतंच आहे. मी डब्बा आहे आणि उध्दव ठाकरे इंजिन आहेत, त्यामुळे ते जिकडे नेतील मी तिकडे जाणार, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा –देहूतल्या कार्यक्रमात अजित पवार भाषणापासून ‘वंचित’, पंतप्रधान मोदीही म्हणाले, ‘दादांना बोलू द्या’

जसा काय गावातला पैलवान निवडून आलाय, गुलाबराव पाटलांची भाजपवर टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.