मुंबई: मराठी टेलिव्हिजनवर सध्या नवनवीन विषयांवर (Upcoming Marathi Serials) मालिका येत आहे. विशेषत: नव्याने सुरू झालेले चॅनेल्स विविध विषय हाताळत आहेत. मात्र ‘रोमान्स’ हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून मालिका विश्वात आहे. प्रेक्षकवर्ग या शैलीकडे अधिक आकर्षित होतात, हे दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपी रेटिंगवरुन (Marathi Serials TRP Rating) नक्कीच स्पष्ट होते आहे. अशीच एक रोमँटिक मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

हे वाचा-हिंदी शोसाठी भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे सोडणार ‘चला हवा येऊ द्या?’

ही मालिका सोनी मराठी (Sony Marathi New Serial) या चॅनेलवर येणार असून अद्याप या मालिकेचे नाव गुलदस्त्यात आहे. ‘घेऊन येतोय नवीन प्रेम कहाणी…!’, अशा कॅप्शनसह सोनी मराठीने या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेत मराठी भाषेव्यतिरिक्त कन्नड भाषेतील डायलॉग्ज देखील ऐकायला मिळणार आहेत. कारण यातील नायिका कन्नड भाषिक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मराठी बोलणारा हिरो आणि कन्नड बोलणारी हिरॉइन असा विषय मालिकेतून हाताळला जाणार आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या संस्कृती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

हे वाचा-असं काय झालं की मिलिंद म्हणाला, ‘मला रडायला ग्लिसरीन लागत नाही

कोण साकारणार मुख्य भूमिका?
‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका एकेकाळी यशाच्या शिखरावर होती. या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही चाहत्यांच्या आवडीचे आहे. राणा दा-पाठक बाई ही जोडी प्रेक्षकांच्या आवडीची जोडी होती. या मालिकेतील सूरज दादा उर्फ सन्नी दादा आठवतोय का? तर सूरज अर्थात राज हंचनाळे या नव्या मालिकेतील मुख्य पात्र साकारणार आहे.


अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यात राज याच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसेल. अद्याप या मालिकेचे नाव जरी समोर आले नसले तरी प्रेक्षकांनी सोशल मीडियावर केलेल्या कमेंट्सवरुन त्यांना मालिकेचा प्रोमो आवडल्याचे दिसते आहे.


अभिनेता हार्दिक जोशी अर्थात राज याचा ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील ऑनस्क्रीन भाऊ याने देखील या मालिकेचा प्रोमो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ‘लव्ह यू भावा, ऑल द बेस्ट ‘ असं म्हणत राणा दा याने राज हंचनाळे याला नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्दिक जोशी इन्स्टाग्राम पोस्ट

गेल्या काही काळापासून सोनी मराठीने नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ‘बॉस माझी लाडाची’, ‘सुंदर आमुचे घर’, ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता ही नवी रोमँटिक मालिका प्रेक्षकांवर जादू करण्यात यशस्वी होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

प्रार्थना बेहेरेची लंडनमध्ये मनसोक्त भटकंती

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.