आपण आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेतो. पण नखांची हवी तशी काळजी घेत नाही. चेहरा, केस आणि शरीराच्या सौंदर्याव्यतिरिक्त, नखांचे सौंदर्य देखील खूप महत्वाचे आहे. आपण अन्न हाताने खातो त्यामुळे आपल्या नखांची काळजी घेणं हे महत्वाचे असते.यासाठी वेळोवेळी नखे कापणे, ती पॉलिश करणे, नेल पेंट लावणे आणि त्यांना चांगला आकार देणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात.

पण नखांची काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असते. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या नाहीत तर नखं खराब होण्याची जास्त भीती असते. पण बाहेरील गोष्टींपेक्षा आहार, मॉइश्चरायझर या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या मनल्या जातात. चला तर मग जाणून घेऊयात आपण नखांची कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो.
(फोटो सौजन्य :- टाइम्स ऑफ इंडिया)

नखे कापल्यानंतर अशी घ्या काळजी

नखे कापल्यानंतर त्यांची काळजी घेणं महत्त्वाचे असते. त्यामध्ये नखे कापल्यानंतर तुम्ही त्यांना मॉइश्चराइज लावू शकता. किंवा खोबरेल तेल देखील वापरु शकता. जर तुम्ही असे नाही केले तर नखं आणि नखांच्या जवळील त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ लागते.

(वाचा :- Happy Birthday Shilpa Shetty : 47 व्या वर्षीही 25 वर्षांची दिसते शिल्पा शेट्टी, समोर आलं तिच्या सौंदर्याचे रहस्य, पॉकेट फ्रेंडली उपायांनी द्या त्वचेला नवा ग्लो)

स्वस्त नेल पेंट लावणे

नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे नेलपॉलिश लावतात, परंतु काही वेळा पैसे वाचवण्यासाठी स्वस्त पेंटचा वापर केला जातो, यामुळे नखे ठिसूळ आणि पिवळी पडतात. त्यामुळे कमी दर्जाच्या नेलपेंटचा वापर करु नका. यामुळे नखं खराब होतात. त्याच प्रमाणे नेलपेंटचे अनेक थर देखील लावत जावू नका. यामुळे नेलपेंट निघून तुमच्या शरीरात जाण्याची शक्याता जास्त असते.

(वाचा :- सावधान ! केसांना तेल लावल्यानंतर ही ५ कामं चुकूनही करु नका, नाहीतर टक्कल पडेल !)

संतुलित आहार घेणे

नखेच नाही तर संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्याची पहिली अट म्हणजे संतुलित आहार घेणे, त्यात संतुलन बिघडले तर कुठेतरी त्रास सहन करावा लागू शकतो. पोषक तत्वांनी युक्त आहार घेतल्यास ठिसूळ नखांपासून सुटका होते, तसेच नखे मजबूत होतात. आरोग्यदायी पदार्थ न खाल्ल्यास नखांची चमक नष्ट होऊन ते कमकुवत होऊ लागतात. नखे मजबूत करण्यासाठी तुम्ही सलाड आणि भाज्यांचा सामावेश जेवणामध्ये करु शकतो.

(वाचा :- Happy birthday sonam kapoor : ३७ व्या वर्षीही तरुण दिसते सोनम कपूर, जाणून घ्या तिच्या सुंदर त्वचेचे गुपित)

नखे वेगळ्या पद्धतीने कापणे

काही वेळा महिला आकर्षक बनवण्यासाठी नखे वेगवेगळ्या आकारात कापतात, परंतु असे केल्याने नखे कमकुवत होऊ लागतात आणि नंतर तुटतात, अशा स्थितीत नेहमी चंद्राच्या आकारात नखे कापणे फायद्याचे राहते. त्याच प्रमाणे रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये नखे अर्धी तुटतात. त्यामुळे नखांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी ती विशिष्ट आकारात कापा.

(वाचा :- Underarms Whitening at Home : काळ्या अंडरआर्म्सची लाज वाटते? मग हे उपाय करुन पाहा काळपटपणा कायमचा दूर होईल)

नखांसाठी मॉइश्चरायझर वापरा

जेव्हा तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर वापरता त्यावेळी नखांना देखील मॉइश्चरायझर वापरा. नखांच्या पोषणासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते. यामुळे नखे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे तुमची नखे ठिसूळ होत नाहीत.

(वाचा :- Keratin Treatment कापसाहून मऊ होतील केस, दिर्घकाळ राहिल केरॅटिन ट्रीटमेंट, फक्त या गोष्टी फॉलो करा)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.