बॉलिवूडची क्विन कंगना सध्या तिच्या परिवारासोबत मनालीच्या पर्वतरंगामध्ये मजा करताना दिसत आहे. यावेळी तिने तिच्या परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत केला. पण या सर्वामध्ये लक्ष वेधले ते कंगनाच्या ड्रेसने.

यावेळी कंगनाने एक साधा वनपिस घातला होता. पण या साध्या पोलका डॉट ड्रेसमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत होती. यावेळी कंगनाने तिच्या परिवारासोबत खूपच चांगला वेळ घालवलेला पाहायला मिळाला. तुम्ही देखील एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर सहलीसाठी जाणार असाल तर कंगनाचा हा लूक नक्की ट्राय करु शकता.
(फोटो सौजन्य – Instagram @kanganaranaut)

पोल्का डॉट प्रिंट

साध्या कंगना तिच्या परिवारासोबत मनालीमध्ये चांगला वेळ घालवत आहे. यावेळी तिने पोल्का डॉट प्रिंटचा एक वनपिस परिधान केला होता. कंगनाच्या या साध्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पिंक कलरच्या पोल्का डॉट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसला व्ही नेकलाइन आणि स्लीव्हजवरील एक नॉट देण्यात आली होती.

(वाचा :- जीन्स निवडताना या ५ चुका कराल, तर अजूनच जाड दिसाल, आताच सावध व्हा !)

आउटिंगसाठी योग्य ड्रेस निवडा

कंगना आपल्या कुटुंबासोबत मनालीच्या हिरवळीमध्ये फिरायला गेली होती, तो संपूर्ण परिसर हिरवळीने बहरला होता. सोबतच बाजूला एक पाण्याचा झरा देखील पाहायला मिळत आहे. कंगना या कॅज्युअल फ्रॉकमध्ये खूप मजा करताना दिसत आहे.

(वाचा :- ये लाल इश्क ! लाल साडीला पाचूचा साज, साउथ ब्युटी नयनताराचे साडीला दिपवणारे सौंदर्य )

पोल्का डॉट प्रिंट्समध्ये येतील मस्त फोटो

जर तुम्ही हिरवळीमध्ये फिरायला जायचा विचार करत असाल तर पोल्का डॉट प्रिंट्सचा नक्की विचार करा. त्याच प्रमाणे यावेळी ड्रेसच्या रंगाचा दिखाल विचार करा. या काळात तुम्ही ब्राईट रंग वापरु शकता. हे ड्रेस आरामदायी असतात. त्यामुळे तुम्ही मोकळेपणा फिरु देखील शकता.

(वाचा :- प्रियांका चोप्राच्या डीप व बॅकलेस गळ्याच्या व्हाईट अँड ब्लॅक ड्रेसवर खिळल्या लाखो नजरा, ट्रोलर्स सुद्धा बोल्ड लुक बघून झाले घायाळ..!)

फ्रिलची कमाल

कंगनाच्या या ड्रेसला असणाऱ्या फ्रिलमुळे हा ड्रेस खूप सुंदर दिसत होता. पण असे ड्रेस घालताना त्यांच्या फिटिंगकडे जास्त लक्ष द्या.

(वाचा :- Happy Birthday Sonam Kapoor : हॉट मॉम टू बी !, प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश कसे दिसावे या विचारात आहात? मग सोनम कपूरकडून या टिप्स नक्की घ्या)

लांब कोट

या सुंदर ड्रेसवर कंगनाने लांब कोट देखील घातला आहे. तुम्हाला जर अजून कॅम्पटेबल लूक हवा असेल तर तुम्ही देखील वनपिसवर लांब कोट घालू शकता.

(वाचा :- डीप नेक, प्रचंड आत्मविश्वासने केल्या बोल्डनेसच्या सर्व लिमिट्स क्रॉस, प्रियंका चोप्राच्या ड्रेसने सर्वांचीच बोलती बंद)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.