परभणी शहरातील रस्ता प्लॉट येथील माऊली नगरमध्ये राहणाऱ्या शिवाजी किसन जाधव याला सामीने फोन करून गंगाखेड नाका येथे बोलावून घेतले. त्यामुळे शिवाजी जाधव यांच्या घरच्यांनी शेजारी रहात असलेल्या सय्यद आबेद सय्यद आसूद याला गंगाखेड नाथा येथे जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे तो गंगाखेड नाका येथे गेला असता शिवाजी जाधव याला समी आणि त्याच्या सोबत असलेल्या विकी, शफी आणि मशु हे मारहाण करत असल्याचे दिसले.
हेही वाचा –सिंहगडावर पर्यटकांनी मधमाशांना डिवचलं; मधमाशांच्या हल्ल्यात ७-८ जण जखमी
समी याने शिवाजीला गळा धरून खाली पाडून मारहाण करत असताना सय्यद आबेद सय्यद आसूद हा त्या ठिकाणी गेला आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समी याने ‘तू भांडण सोडवणारा कोण’, असे म्हणत सय्यद आबेद याच्या पाठीत खंजीरने वार केले. तसेच, शिवाजी जाधव यांच्या पाठीत खंजीर मारून त्यांनाही जखमी केले.
हेही वाचा –ज्येष्ठ नागरिक चोरट्यांच्या टार्गेटवर; वीजबिल भरण्याच्या नावाखाली आर्थिक गंडा
यावेळी समीच्या सोबत असलेल्या विकी, शफी आणि मशु यांनीही या दोघांना मारहाण केली. सय्यद आबेद सय्यद आसूद याला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सय्यद आबेद सय्यद आसूद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समी, विकी, शफी आणि मशु याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा –घरी आले तेव्हा पायवर जखम, रात्री झोपेतच गेला जीव; नाशिकमध्ये व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू
सलमान खानला ठार मारण्याची धमकी; गुन्हा नोंद झाला असून सुरक्षेत वाढ