नंदुरबार : शहादा तालुक्यातील दोदवाडा शेत शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेत एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (one lost life in lightning strike at shahada in nandurbar)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील फेस येथील रहिवासी अर्जुन सोमजी पाटील यांचे दोदवाडे शिवारात असलेल्या शेतात सायसिंग तडवी (वय २५ वर्षे) हा कुटुंबासह शेतात एका छोट्या झोपडीत राहत होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या भागात वीज व वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. सायसिंग तेजका तडवी त्याची पत्नी ईमा सायसिंग, सासू रतनी गोमता पाडवी आणि शेतमजूर ईश्वर नथ्थू चौधरी हे शेतात असलेल्या झोपडीत थांबलेले होते. त्याचवेळी वीज पडली आणि त्यात दुर्दैवाने सायसिंग तेजका तळवी याचा मृत्यू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा- दोन दुचाकींच्या धडकेत कंटेनरने चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी

धाडगाव तालुक्यातील वरखेडा येथील रहिवासी असून तो आपल्या कुटुंबासह राहून नफ्यावर शेतात काम करीत होता. कुटुंबियातील कर्त्या पुरुषाचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेत फेस येथील रहिवासी शेतमजूर ईश्वर नथू चौधरी हा जखमी झाला आहे. जखमीला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- खाऊ आणण्यासाठी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं, तीन चिमुकल्यांनी एकत्रच गमावले प्राण

मृत रायसिंग तडवी याच्या कुटुंबीयांनी परिसरात राहणाऱ्या नातेवाईक यांना फोन करून घटनेबाबत माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मंडळ अधिकारी विजय सावळे, तलाठी महेश ठाकरे, निलेश मोरे तसेच सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भगवान कोळी यांनी पंचनामा केला.

क्लिक करा आण वाचा- शिवसेनेनं आणखी एका जिल्हाप्रमुखाला दिलं निष्ठेचं बक्षीस; आमशा पाडवी कोण आहेत?

पाउस जास्त झाला असल्यामुळे शेतात चालतांना अडथळा येत होता कोणतेही वाहन घटनास्थळी येऊ शकत नसल्याने नातेवाईकांनी लाकडी दांड्याला झोळी करून रायसिंग तडवी याला रस्ता पर्यंत आणले. यानंतर मयत झालेल्या रायसिंग तडवी याचे शवविच्छेदन करण्यासाठी सारंगखेडा रुग्णालयात पाठविण्यात आले. या आदिवासी कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.