लखनौः उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच आईची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. आई पबजी गेम खेळू देत नव्हती म्हणून रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने आईची हत्या केली. तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. बुधवारी अल्पवयीन मुलाला त्याचे वडिल पोलिस ठाण्यात भेटायला गेले होते. वडिलांना समोर बघूनही या मुलाला पश्चात्ताप झाला नाही उलट वडिलांसमोरच तो आईची तक्रार करत होता.

पोलिस ठाण्यातील आरोपीची वर्तवणबक पाहता सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याने केलेल्या कृत्याचा त्याला थोडादेखील पश्चात्ताप त्याच्या डोळ्यात दिसत नाहीये. बुधवारी जेव्हा त्याचे वडिल त्याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात आले तेव्हा त्यांना अपेक्षा होती मुलगा त्यांना कडकडून मिठी मारुन शोक व्यक्त करेल किंवा त्याने केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप असेल. मात्र, तसं काहीच घडलं नाही, वडिल भेटायला आल्यानंतर त्यांने आईच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. आई जेवायला देत नसे, भरपूर मार पण द्यायची आणि वडिलही लक्ष देत नव्हते, असं त्यांना यावेळी सांगितलं.

वाचाः धक्कादायक! आधी आईवर गोळी झाडली, नंतर मुलाने मित्रांना घरी बोलवून पार्टी केली

आईच्या हत्येनंतर त्याने ऑनलाइन अंडा-करी ऑर्डर केली होती. तसंच, मित्रांना घरी बोलवून पार्टीदेखील केली होती. मित्रांनी घरी आल्यानंतर त्याच्या आईविषयी विचारलं तेव्हा आई काकीच्या घरी गेली आहे, असं सांगितलं. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आईचीच हत्या केल्याने मोठी खळबळ माजली आहे.

मालिका पाहून रचली हत्येची कहाणी

मालिका पाहून त्याने हत्येची कहाणी रचली होती. आरोपीचे वडिल लष्करात अधिकारी आहेत. ते घरी आल्यानंतर त्यांची बंदूक साफ करत असत. बंदूक साफ करुन झाल्यानंतर ते कपाटात ठेवत असत. मुलाला हे सगळं माहिती होतं. तो कित्येक दिवसांपासून कपाटाची चावी शोधत होता. त्यानंतर त्याने एक खोटी चावी बनवून घेतली. आई कित्येत दिवसांपासून पबजी खेळण्यावरुन त्याला रागवत होती. याचा राग त्याने मनात धरुन ठेवला होता. एक दिवशी आईने त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला होता. तेव्हा आपल्या आजोबांकडे त्याने आईची तक्रार केली होती. आजोबांच्या सांगण्यावरुन त्याला आईने फोन पुन्हा परत केला होता.

या घटनेनंतरही त्याने आईची हत्या करण्याचा कट रचला होता. आरोपीने युट्यूब व्हिडिओ पाहून गोळी चालवायला शिकला होता. आईने पबजी खेळण्यापासून अडवल्याने त्याने त्यादिवशीच रात्री आईच्या डोक्यात गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून बहिण धावत खोलीत आली. त्यानंतर त्याने बहिणीलाही दुसऱ्या खोलीत नेऊन धमकावले.

वाचाः पबजी खेळण्यावरुन वाद टोकाला पोहोचला; मुलाने आईची गोळी झाडून हत्या केली अन्…

आईची हत्या केल्यानंतर त्याने घरातील कुत्र्याला बाहेर बांधले होते. तीन दिवस कुत्रा बाहेरच होता. आरोपीचे वडिल घरी पोहोचल्यानंतर त्याने कुत्र्याला सोडले. दरम्यान, आरोपीला कित्येकदा शाळेतून काढण्यात आले होते. ऑनलाइन गेमबरोबरच त्याच्या अन्य तक्रारीही शाळेतून येत होत्या. तो प्रत्येकाला उलटं उत्तर द्यायचा. त्याच्या वाईट वर्तवणूकीमुळं त्याला शाळेतून काढण्यात आले होते. तर, एक वर्षापूर्वी तो घर सोडून पळाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.