IND vs SA Series 2022: मुंबई : भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने २-० अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीत पाहुण्या संघाने भारतावर ७ गडी राखून तर कटकमध्ये ४ गडी राखून मात केली. यासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या भूमीवर टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब होत चालला आहे. भारताने घरच्या मैदानावर या संघाविरुद्ध एकूण ६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला ५ वेळा पराभवाची धूळ चारली आहे. एवढेच नाही तर दक्षिण आफ्रिकेने २०२२ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताला एकही सामना जिंकू दिलेला नाही.

वाचा – असं कुठवर चालणार; रोहित शर्मा नसेल तर तुम्ही जिंकणार नाही का?

कसोटी गमावली आणि विराट कोहलीचा राजीनामा
२०२२च्या सुरुवातीला टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती. यावेळी दोन्ही संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात आमनेसामने आले. भारतीय संघाला मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी होती, पण डीन एल्गरच्या नेतृत्वातील यजमान संघाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले आणि २-१ अशी मालिका काबीज केली. ३ जानेवारी रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील दुसरी कसोटी हरला. दुखापतीमुळे कोहलीला या सामन्यातून बाहेर बसला होता, पण ११ जानेवारीला खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटीतही संघाचा पराभव झाला होता आणि यावेळी विराट कोहली कर्णधार होता. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून राहुलची सुरुवात पराभवाने झाली.

वाचा – ENG vs NZ: विराट कोहलीचा रेकॉर्ड धोक्यात; न्यूझीलंडविरुद्ध रूटची आणखी एक सेंच्युरी

केएल राहुलचे पदार्पण
टीम इंडियावरील विजयी मालिका कायम ठेवत, यानंतर जेव्हा दोन्ही संघ एकदिवसीय मालिका खेळली गेली, तिथे टेंबा बावुमाच्या नेतृत्वातील संघाने क्लीन-स्वीप करत वनडे मालिका खिशात घातली. मालिकेपूर्वी रोहित शर्माची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पण हिटमॅन दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडल्याने केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली. अशा परिस्थितीत कर्णधार म्हणून केएल राहुलचे वनडे कर्णधार म्हणून पदार्पण पूणतः निराशाजनक ठरले.

वाचा – टीम इंडियाची होतेय धुलाई; विजय मिळवून देणारे मात्र करतायत मौज-मजा

दक्षिण आफ्रिकेचा पाहुणचार करण्याची संधी
परदेशात मानहानीकारक पराभवाचा हिशोब चुकता करण्याची भारतीय संघाला संधी आहे. आयपीएल २०२२ च्या व्यस्त वेळापत्रकानंतर नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आणि त्याच्या जागी केएल राहुलला संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, मालिका सुरु होण्यापूर्वीच राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला आणि ऋषभ पंतला आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्णधार म्हणून पदार्पणाची संधी मिळाली. आता पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत या वर्षी सलग ७ सामने जिंकून आफ्रिकन संघाने भारतीय संघाच्या तीन कर्णधारांवर वर्चस्व राखले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.