बवालियाखेडी असे या गावाचे नाव आहे. या गावातील ही विद्यार्थिनी नियमित शाळेला जात होती. त्यावरून, गावातील काही लोक नाराज होते. ती शनिवारी शाळेतून परत येत असताना, आरोपींनी तिला अडवले. ‘गावातील अन्य मुली शाळेत जात नाहीत, तूसुद्धा जाऊ नकोस,’ असे सांगून त्यांनी तिचे दप्तर हिसकावले. तिच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली. तिने ही गोष्ट कुटुंबीयांना सांगितली असता, तिचा भाऊ जाब विचारण्यासाठी आला. त्यानंतर आरोपींनी मुलीच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, सात जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.