या विद्यार्थ्याला दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान आज शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेची माहिती त्याची आजी रेवती रामचंद्र फावरे यांनी दिली आहे. या विद्यार्थ्याचे वडील मुंबईत नोकरीनिमित्त असतात तर आई दापोली उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी आहे.
आज दहावीच्या निकालाच्या दिवशीच निकाल लागण्यापूर्वीच केवळ मोबाईल देण्यास आजोबांनी नकार दिला म्हणून या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दापोली पोलीस स्थानकात सीआरपीसी १७४ नुसार तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड काॅन्स्टेंबल पवार करीत आहेत.