मुंबई : दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आईचं निधन झालं. स्वत: मिश्रा यांनी ट्विटरवर ही दु:खद बातमी शेअर केली. सुधीर मिश्रा आईच्या निधनानं कोलमडून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

CID तील इन्स्पेक्टर ऋषिकेश पांडेला खऱ्या चोरांनीच लुटलं

सुधीर मिश्रा यांनी ट्विटरवर सांगितलं, ‘माझ्या आईचं काही तासांपूर्वी निधन झालं आहे. ती शेवटचे श्वास घेत होती, तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने तिचा हात धरला होता. आता मी अनाथ झालो. पोरका झालो आहे.’ सुधीर मिश्रांच्या आईचं नाव दुर्गा देवेंद्रनाथ मिश्रा आहे.

सोशल मीडियावर इंडस्ट्रीमधले अनेक जण श्रद्धांजली देत आहेत. या दु:खाच्या वेळी फिल्म जगतातले अनेक जण मिश्रांचं सांत्वन करत आहेत. अमृता खानविलकर, अमृता राव, आयुष्मान खुराना यांनी सुधीर मिश्रांच्या आईला श्रद्धांजली दिली. या कठीण काळात हिंमत दिली आहे. आयुष्मान खुराना म्हणतो, ‘तुम्ही तुमची काळजी घ्या सर.त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे.’

अमृता राव म्हणते, ‘आपणही त्या देवाचीच लेकरं आहोत. आपल्या सगळ्यांनाच त्याच्या जवळ जायचं आहे. त्या जगात तुमची आई आनंदात राहू दे. हीच प्रार्थना आहे.’ अमृता खानविलकरनं आत्म्याला शांती मिळू दे, अशी प्रार्थना केली आहे.

वटपौर्णिमेला हेमांगी कवी सांगतेय साता जन्माच्या गोष्टी, अभिनेत्रीनं अशी केली पूजा

काही दिवस सुधीर मिश्रांच्या आई हाॅस्पिटलमध्ये होत्या. त्यांची तब्येत खालावत चालली होती. सुधीर मिश्रा ट्विट करून आईच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत असत. १० जूनला त्यांना हाॅस्पिटलमधून फोन आला. त्यात आईकडे आता थोडाच वेळ राहिलाय, असं त्यांना सांगितलं होतं.

शिव ठाकरे एन्जॉय करतो लेह-लडाख ट्रीपSource link

Leave a Reply

Your email address will not be published.